Saturday, November 30, 2013

पेंटिंग चे प्रयत्न

पेंटिंग चे प्रयत्न

                                                    fabric  पेंटिंग कपड्यावर - उशीचा आबराfabric पेंटिंग  कॅनवासवर  वारली पेंटिंग - वॉल पीस 


वेस्ट रिसायकल- घरगुती उपयोग


वेस्ट  रिसायकल- घरगुती उपयोग कुकरच्या  बॉक्सचा खेळ ठेवायला वापर केला आहे 

पाण्याच्या वं दुधाच्या कॅन्स चा असा वापर करू शकतो 
Monday, November 25, 2013

नवरा बायको- एक मजेशीर नाते- एक सुनेहरी आठवण

नवरा बायको- एक मजेशीर नाते- एक सुनेहरी आठवण

सगळ्यात अजब नाते म्हणजे नवरा बायको चे. या नात्यावर किती विनोद केले जातात. किती विचित्र आहे हे नाते. रक्ताचे नाते नसले तरी काही वर्षातच ते इतके दृढ होत जाते.रस्त्याने एक आजी आजोबा चालले होते. त्यांचाकडे पाहून वाटत होते की आजी आजोबांना सांगत होती " तुम्हाला आठवतेय का मी तुम्हाला असे सांगितले होते? "  आणि ते आजोबा आपली मान डोलवत " हो हो " म्हणत होते. खरच या नात्याची गम्मत म्हणजे नवरा निमुटपणे नेहमी बायकोचे म्हणणे ऐकत असतो. 

आपण नेहमी त्याला  तकरारी सांगत असतो पण तो बिचारा ऐकून घेत असतो. कधी कधी चूक आपलीही असते तरीही तो आपलीच  बाजू घेत असतो. हेच आहे आपल्यावरचे प्रेम, पण आपण तरीही त्याच्या प्रेमावर संशय घेत राहतो. पण हा आपला स्वाभाविक गुणधर्म आहे का? म्हणजे नवऱ्यावर निस्सिम  प्रेम करतो म्हणून आपण ही चूक सारखीच करत राहतो. ह्या नात्यात किती गोडवा आहे. खूप मजेदार आहे हे नाते. कधी आपण या नवऱ्यावर  विजेसारखे कोसळतो तर कधी त्याला एका लहान बाळासारखे प्रेमही करतो. नवराही तसेच वागतो, कधी आपले खूप लाड करतो, तर कधी नकळत आपले मन दुखवतो.  

लहानपणी आजी आजोबांचे एकमेकांवरचे प्रेम पहिले होते. खूप भांडायचे दोघे, पण तरीही एक मेकांशिवाय जेवण सुधा नाही जायचे त्यांना  आजोबा खूप सक्त आणि बोलण्यात बेभान होते, आजीला खूप टोचून बोलायचे पण तरीही आजोबांच्याच आवडीचे जेवण आजी बनवणार, त्यांना अगदी सगळे हातात आणून देणार. ती सुधा आमच्या जवळ त्यांची तकरार करायची. पण खूप गोड होते ते नाते. 

आई बाबा पण किती भांडत असतात, म्हणजे लहानपणापासून असा एकही आठवडा गेला नाही की त्यांचे भांडण झाले नसेल. पण आई कधी  आजोळी गेली, किव्वा कुठे बाहेर गेली की बाबांचे सारखे तिला फोन. त्यांना कर्मत नाही तिच्याशिवाय. 

नवीन नवीन लग्नानंतर एकदा आम्ही ऑफिस सुटल्यावर बाइक वरून घरी जात होतो आणि अचानक काही कारणाने संतोष - माझा नवरा माझ्याशी उगाच वाद करायला लागला, मला कळेच न याला काय झाले. घर जवळ आले तसे त्याने अजून जास्त वाद घालायला सुरुवात केली. मग मी पण काही सोडले नाही वाद घालायला, शेवटी त्याने बाइक थांबवली आणि मला खाली उतरवले. मी सुद्धा अगदी अभिमानाने किव्वा स्वाभिमानाने लगेच खाली उतरले आणि घराच्या दिशेने चालू लागले. मला खूप आश्चर्य आणि वाईट वाटत होते. हा असा का वागतोय?  काय झाले याला? मग मी घरी गेले तर अजूनच चीड आली मला. तो मस्त सोफ्यावर अडवा होऊन टीवी बघत होता, वर मला order  सोडू लागला - पाणी आण, चहा आण, काही खायला दे- वगैरे वगैरे. मला खूप त्रास होत होता आता. पण मी विचार केला कि काही बिनसले असेल कुणाशी आणि आपल्यावर राग काढतोय म्हणून निमुटपणे त्याचे ऐकत होते. मग माझे किचन मध्ये ओट्यावर लक्ष्य गेले तर एक सुंदर बॉक्स  गिफ्ट pack करून ठेवला होता. त्यात सुंदर सोन्याचे कानातले आभूषण होते, आणि मग मला कळले की हा असे का वागतोय. हे लग्नानंतरचे पहिले सरप्राइस गिफ्ट होते. खूप छान होता तो क्षण. मग त्याने कबुल केले की यासाठी तो इतके वाईट वागला आणि मला खाली उतरवून घरी लवकर येउन त्याने हे सरप्राइस अरेंज केले. Saturday, November 16, 2013

आपण सगळेच एकटे आहोत

आपण सगळेच मनाच्या एका कोपऱ्यात एकटे आहोत का?

आई, बाबा, भावंड, नवरा, बायको, मुलं, नातेवाईकांच्या घोळक्यात, मित्रांच्या- मैत्रिणींच्या टोळीत, कधी नं कधी कुठेतरी आपण एकटे आहोत ना?

आपण जगाला का भुरळ पडतोय कि आपण एकटे नाही आहोत, आपण खरच एकटे आहोत. 

आई बाबांच्या, भावंडांच्या भांडणात,
जरी रक्ताची नाती आहेत तरी आपण एकटे आहोत. 

नवरा बायको जरी जगासाठी एक आहेत तरी ते एकटे आहेत,
आतल्या आत कुठे तरी ते वेगळे आहेत. 

पोरं बाळं  झाली तरी आपण एकटेच आहोत,
ती मोठी झाली की त्यांचे मार्ग पकडणार. 

मित्र मैत्रीण बदलत राहणार, शाळेत, कॉलेजमध्ये, नोकरी मध्ये  कायमस्वरूपी कोणी नाही, 
आज इथे उद्या तिथे, एक ठिकाण नाही, जग बदलते तसे ते ही बदलणारच. 

राहिले कोण? आपण स्वतः का?
पण आपण तरी आपले आहोत का? या जगासाठी स्वतःला  बदलतोय, जगाच्या गतीने चालायचा प्रयत्न करतोय, स्वतःच्या गतीने नाही. 

Thursday, November 14, 2013

चकली भाजणी सूप

चकली भाजणी सूप

दिवाळीनंतर चकली भाजणी  उरली तर काय?

त्याचे थालीपीठ होते. पण थालीपीठ सगळ्यांनाच नाही आवडत. तर एक नवीन मेनू आपण ट्राय करू शकतो.
चकली भाजणी सूप. अतिशय पोषक, आणि चविष्ट.  आपण यात आपल्या आवडीप्रमाणे कितीही भाज्या टाकू शकतो .साहित्य

५-६  टेबलस्पून चकली भाजणी
१ चिरलेला कांदा
१/२ किसलेले किव्वा बारीक चिरलेले गाजर
१ टोमाटो बारीक चिरलेला
२ चमचे तेल
१-२ लसुन पाकळी बारीक चिरलेली
१/२- १ लिटर पाणी
मीठ चावी पुरता
हळद
कोथिम्बिर
१ मिरची

कृती

१. एका पातेल्यात पाणी आणि भाजणी एकत्र करावे. गाठी सोडवून घ्यावा
२. काढीत तेल गरम करावे आणि त्यात लसुन पाकळी, मिरची, कांदा परतून घ्यावा.
३. मग त्यातच टोमाटो, गाजर परतुन घ्यावे. हळद टाकावी.
४. भाज्या परतल्यावर त्यात  पाणी आणि भाजणी चे मिश्रण ओतावे. चावी पुरता मीठ टाकावे.
५. त्याला चांगली उकळी येऊ द्यावी. शिजू द्यावे.
६. सूप घट्ट होई पर्यंत उकळावे.
७. गरमागरम सूप बाउल मध्ये सर्वे करताना मस्त त्यावर कोथिम्बिर ने गार्निश करावे.


Tuesday, November 12, 2013

वेस्टर्न एक्स्प्रेस थोडी हळू जाईल आणि येताना फक्त चांगले आदर्श घेऊन येईल का?

एकदा वसई ला आई बाबा आणि बहिणी बरोबर एका हॉटेल मध्ये जेवायला गेले होते.  हॉटेल च्या बाहेर अचानक बाबांना ऑफिस मधले  एक जुने मित्र भेटले.  त्यांच्या बरोबर त्यांची मुलगी आणि मुलगा पण उभे  होते. वयाने दोघेही लहान होते, मुलगी कॉलेज मध्ये आणि मुलगा शाळेत शिकत असावेत. होते तितका वेळ तोंडात सतत चिंगम चघळत होते दोघेही. बाबांशी ओळख करून देताना सुद्धा ती दोघेही चिंगम चघळत मिश्किलने हसत बाबांकडे पाहत होती. आम्हाला थोडे  विचित्रच वाटले हे वागणे. आम्ही निघालो तिथून लवकरच, नंतर आमच्यात हीच चर्चा झाली कि किती बेशिस्त आहे हि आजची पिढी. नमस्कार चमत्कार किव्वा हाय सुद्धा नाही केला त्या दोघांनी. किती बदल झाला आहे पुढच्या पिढी मध्ये. हीच ती सो कॉल्ड  नवीन पिढी आहे का? काय आहेत यांचे आचार विचार? हि पिढी स्वार्थ, कपट आणि किती उद्धट  विचारांनी घडवली गेली आहे. यांचात आपल्यासारखे  शिष्यत्व, बालिशपणा  का नाही राहिला? पण यांना घडवले कोणी? नंतर तिथेच टीवीवर बलात्कार ची बातमी झळकली त्यात बलात्कारी होते सगळे अल्पवयीन. आमच्या चर्चेने अजून वेगळे वळण घेतले. आजकाल बलात्कारांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. आश्चर्य याचे वाटते कि बलात्कार करणाऱ्यांमध्ये आता अल्पवयीन शालेय, कॉलेज चे विद्यार्थी पण सामील होऊ लागले अहेत.  हे का घडतेय? कोण आहे याला जबाबदार?


वसईत घराजवळ एक नावाजलेला कोचिंग क्लास आहे. त्या क्लास च्या बाहेर नेहमी शालेय विद्यार्थी उभे असतात. त्यात जास्तीत जास्त प्रमाण ८वी  ते १०वी  मधल्या मुलांचे असते. हि सगळी पोरं पोरी  घोळक्यात उभी असतात. जवळ जवळ ८० टक्के मुलांच्या हातात मोबाईल किव्वा स्मार्ट फोन असतोच. त्यांचे कपडे, त्यांचे वागणे, बोलणे हे सगळे अगदी टीवी वर असलेल्या जाहिराती , कार्यक्रम आणि नवीन सिनेमाने प्रभावित असते  हे लगेच आढळते. आजच्या ह्या पिढीला पाश्चात्य संस्कृती कडे ओढून नेणारे सगळ्यात मोठे श्रय हे टीवी वर च्या जाहिराती आणि सिनेमा मध्ये वाढलेल्या अशलीलपणालाच दिले पहिजे. त्याच मुळे भारतात सध्या च्या युगात व्यभिचार, लैंगिक शोषण आणि बलात्कार सारख्या घटना सारख्या घडू लागल्या आहेत.  

टीवी वर च्या  अनेक जाहिरातींमध्ये ते विशिष्ठ उत्पादन हे पुरुष वं  स्त्रिया एकमेकांना आकर्षित करण्या करिता वापरू शकतात असे स्पष्ट पणे दर्शवले जाते. उदाहरण घ्यायचे झाले तर dio स्प्रे, टूथपेस्ट, पावडर चा वापर पुरुष वं  स्त्रीया एकमेकांना आकर्षित करायला वापरावे असे त्यांच्या जाहिरातीत दर्शवले आहे, कॉलेज मध्ये किव्वा शाळेत मुलगा मुलीला चॉकलेट देऊन तिला आपल्या जवळ करू शकतो,  स्त्रियांनी सौंदर्य प्रसाधने केवळ पुरुषांना घायाळ करायला वापरावी, नीट नेटके राहायला नव्हे. गर्भनिरोधाकांच्या जाहिराती खुलेआम दिवसभर दर्शवल्या जातात, आणि अगदी स्पष्टीकरणा सकट, काही जाहिरातींमध्ये तर चक्क अशालील घाण चलचित्रांचा वापरही केला जातोय. म्हणजे एकंदर तुम्ही जे काही कराल वापराल, त्याचे उद्देश्य एकच आहे ते म्हणजे आकर्षण असे या नवीन पिढी ला  सांगायचे असते का जाहिरातीतून. 

यंदा शालेय नवतरुणींवर हॉट pant आणि अर्धांग उघडे ठेवणाऱ्या कपड्यांचा  खूप प्रभाव आहे. सिनेमातल्या ताराकांसारख्या बिनधास्त आणि सुंदर राहण्याचा तंतोतंत  प्रयत्न करतात. पण असे कपडे घालण्यामागची  त्यांची नक्की  काय भावना आहे  हे आधी त्यांनी ठरवावे. "मुलाच्या बरोबरीने आम्ही सुद्धा बर्मुडा घालणार अंगाचे प्रदर्शन करणार "अशी भावना आहे का? कि आपले पाय शरीर किती सुंदर आहेत हे त्यांना दाखवायचे आहे? मुलगी आणि मुलगा हे सगळ्या दृष्टीने बरोबरीचे आहेत त्यात काही वाद नाही. पण निसर्गाच्या दृष्टीने त्यांच्यात काही प्रमाणात फरक तर आहेच. आणि तो आपण नाकारू नाही शकत . 

हे सगळे टीवी, आणि नवीन सिनेमे यांचेच तरुण पिढीला दिलेले आदर्श अहेत. आपण ज्या पिढीत होतो ती नशीबवान होती आणि आपल्या आई वडिलांची तर अजूनच नशीबवान होती. पाश्चात्य संस्कृती मध्ये विलीन होत चाललेली ही पिढी आपले संस्कार, आपली हिंदू संस्कृती विकून आपल्या देशाला काय भविष्य देणार काय माहिती. आपल्या सुंदर पुरातन संस्कृतीचे स्थानक सोडून हि वेगवान वेस्टर्न एक्स्प्रेस थोडी हळू जाईल आणि येताना फक्त चांगले आदर्श घेऊन येईल का?Tuesday, July 9, 2013

लिंग्विनी पास्ता

लिंग्विनी पास्ता 

साहित्य :

७-८  बेबी टोमाटो 
२ मोठे मशरूम
२ चमचे बोलोग्निस  किव्वा टमाट्या चा  सॉस 
२ रंगीत सिमला मिरची 
२ मोठे कांदे 
१  लसुन 
१  मोठे वांगे 
१  झुकीनी किव्वा गिलके 
१ पाकीट लिंग्विनी  पास्ता 
मीठ व मिरपूड चवीपुरता 
ओलिव ओइल २-३ चमचे कृती:

१. ओवन १२० दशांश वर गरम करायला लावायचे. 
२. सगळ्या भाज्या एक एक इंच लांब व रुंद कापाव्यात. बेबी टमाटे अक्खेच घ्यावे. 
३. एका मोठ्या बेकिंग ट्रे मध्ये त्या पसरवून ठेवायच्या. त्यावर ओलिव ओइल, मीठ, मिरपूड टाकावे. ४. पास्ता शिजवून घ्यावा 
५. एका भांड्यात थोडे तेल गरम करून त्यात बोलोग्निस टाकावे आणि ते चांगले गरम झाल्यावर त्यातच शिजलेला पास्ता टाकावा. 
६. ओवन गरम झाले ट्रे मध्ये पसरलेल्या भाज्या त्यात १० मिनिटे बेक करून घ्याव्या. 
७. प्लेट  मध्ये तयार झालेल्या पास्ता वर या ट्रे मधल्या भाज्या पसरवून द्याव्या. 
८. लीन्ग्विनी पास्ता तयार. 

झटपट अवोकॅडो आणि फिग सलाड

टपट अवोकॅडो आणि फिग सलाड  

साहित्य :

१ अवोकॅडो 
२ अंजीर 
७-८ लिक चे देठ  किव्वा कांद्याची पात 
लेत्टूस ची एक जुडी किव्वा कोबीची ३-४ पाने 
एक्स्ट्रा  व्हर्जिन ओलीव ओइल २-३ चमचे 
बल्सामिक व्हिनेगर २-३ चमचे 
मीठ 
काळ्या मिऱ्याची  पूड चवीपुरता 


पार्सले किव्वा कोथिम्बिर 

कृती:

१. सगळ्या भाज्या, फळे  बारीक चिरून घ्यावे 
२. एका भांड्यात चिरलेल्या भाज्या, फळे,  बल्सामिक विनेगार, ओलीव ओइल, मीठ, आणि मिऱ्याची पूड घालून एक करावे. 
३. डीश मध्ये सर्व करावे. Sunday, March 31, 2013

परदेशात भारतीय असल्याचा अभिमान असू द्या

परदेशात भारतीय असल्याचा अभिमान असू द्या 

तुम्ही जेव्हा एखाद्या प्रगत देशात जाल तेव्हा भारतीय असल्याचा अभिमान राखा.  एकदा परदेशात  एका ओफ़िशल  पार्टी मध्ये गेलो होतो. तिथे एक युक्रेनियन  स्त्री तिच्या ब्रिटीश नवऱ्या बरोबर  आली होती. जेवायला माझ्या बाजूला बसली होती.
जेवताना गप्पा मारायला लागलो तेव्हा तिने भारताचा विषय काढला.

ती म्हणू लागली " मी भारताबद्दल खूप ऐकलेय. तिथली  संस्कृती  खूप सुंदर आहे. तिथले जेवण थोडे तिखट असते पण छान लागते. आणि तिथला निसर्ग तर खूपच मोहक. " तिची प्रशंसा ऐकून मला खूप बरे वाटले आपण भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटला. " मी तो मूवी पहिला मध्ये एकदा, काय बरे त्याचे नाव? …. हा , "स्लमडॉग मिलनेयर " खूप वाईट अवस्था आहे तिथे. किती गरीब आहे ना  भारत!! किती लोक अशी राहत असतील न तिथे!! " हे वाक्य ऐकल्यावर  मला खूप वाईट वाटले, खूप अशांती झाली मनाची . पण मी काही  शांत बसले नाही. लगेच तिला उत्तर दिले, " मला वाटते कि त्या मूवी मध्ये जे दाखवले आहे, तो आमच्या देशाचा खूपच छोटासा भाग आहे. तुम्ही एकदा आमच्या देशात या. तिथली संकृती, तिथली  प्राचीन काळची सुबत्ता तुम्हाला पाहायला मिलेल. आमचे देश तसे खूप श्रीमंत आहे. पारतंत्र्यात आमची सगळी संपत्ती लुटून नेण्यात आली. नाही तर  आज आम्ही आर्थिक रित्या जगातले सगळ्यात श्रीमंत देश असतो. ज्या भारतातली संपत्ती लुटून आज एक  देश इतके श्रीमंत झाले आहे, ते भारत किती श्रीमंत असेल हा विचार कोणी करत नाही. पण आता खूप प्रगती झाली आहे आमची. तुम्ही एकदा नक्की या भारतात. तुम्हाला खूप आवडेल. " असे म्हणून मी तिच्या प्रतिक्रियेची वाट पहिलि. माझ्या मनात देश प्रेमाच्या लाटा उसळ्या मारत होत्या.

तिला माझ्या मनातली घालमेल समजली होती. ती म्हणाली, " मी स्वतः एका गरीब देशातली आहे, युक्रेनची, मी समजू शकते कसे वाटते कुणी आपल्या देशाला गरीब म्हंटले की. सॉरी, जर मी तुम्हाला दुखावले असेल तर."  
" ओके . नो प्रोब्लेम, मला थोडे वाईट वाटले. पण ठीके. " असे म्हणत मी तो विषय संपवला. त्या वेळी मला त्या मूवी च्या डिरेक्टर चा, प्रोडूसर चा  खूप संताप आला होता. तो डिरेक्टर स्वतः  एक ब्रिटीश आहे.  त्या मुवीत दाखवायला  त्याला भारतातल्या कुठल्याच चांगल्या गोष्टी का मिळाल्या नाहीत. म्हणजे, त्या मुवीत  एक प्रकारे भारताची निंदाच  केली आहे असे म्हंटले तरी चालेल- असे विचार माझ्या मनात घोळत होते.  


परदेशात भारतीयांना नेहमी कमी दर्ज्याची वागणूक दिली जाते, ती याच्याच मुळे. भारत गरीब आहे, तिथे खूप गरिबी आहे. भारतीय म्हणजे घाण, अस्वछ, बेशिस्त असा गैरसमज बऱ्याच  फिरंग्यांना असतो. पण मनाला सारखे वाटते की त्यांनी  कितीही प्रगती केली तरी भारतीय माणसाच्या बुद्धिमत्तेची आणि माणुसकीची सर त्यांना कधीच येणार नाही.  कोणी आपल्या देशाला गरीब म्हणत असेल, आपल्या देशाबद्दल थट्टा, मस्करी करून काही वाईट बोलत असेल,  तर त्याची गोष्ट तुम्ही कबूल करू नका. आपल्या देशाचा मान राखा.!! जय हिंद !! 
!! जय महाराष्ट्र !!

Thursday, March 28, 2013

मोझारेला आणि टोमाटो सलाड

मोझारेला आणि टोमाटो सलाड

साहित्य -

४  मोठे  टोमाटो
४  टेबल स्पुन एक्स्ट्रा  व्हर्जिन  ओलिव  ओइल
काळी मिरी पूड  - चवीपुरता
मीठ- चवीपुरता
२ ७ ५  ग्राम  मोझरेला  चीझ
८ -१ ०  बेसील / कोथिम्बिर /पुदिना  ची पाने
स्कीव - २-३  नग  (बांबू/ लोखंडा  च्या बारीक लांब काड्या )

कृती -


१. टोमाटोचे  बारीक काप  करावे  .

२. मोझारेला  चीझ  चे  बारीक काप  कापावे  .
३. एक स्कीव घेऊन त्यात आलटून पालटून हे काप  लावावेत  .
४. असे होतील तितके स्कीव मध्ये  लाऊन घ्यायचे .
५. ह्या स्कीव्स ला एका प्लेट  मध्ये आडवे ठेऊन त्यावर मीठ व काळी  मिरी पूड चवीपुरता टाकायची .
६. त्यावर मग एक्स्ट्रा  व्हर्जिन  ओलिव  ओइल  चमच्याने घेऊन  एकसरिने ओतत जावे.
७ . त्यावर  बेसील / कोथिम्बिर /पुदिना  ची पाने ठेऊन  गार्निशिंग करावे.

Tuesday, March 26, 2013

"या वाला खाउन जावा अस्सल मराठा मासवडी- आमच्या गावाचा पेशल आईटम."


आमचे गाव राजुरी, जुन्नर मधे घाटावर राहणार्‍या मराठ्यांचे हे गाव. शिवरायच्या शिवनेरीजवळ बसलेले, शेतीने समृद्ध, स्वछ, सुंदर. म्हणजे गुजरात्यांच्या किव्वा नॉन-महाराष्ट्रीयांच्या म्हणण्या नुसार, आम्ही तसे पक्के घाटी. मराठ्यांचा एक विशिष्ट पदार्थ म्हणजे मासवडी. मी माहेरची देशस्थ ब्राह्मण आणि सासर ९६ कुळी मराठा. माहेरी तशी तिखट खायची सवय होतीच पण कांदा, खोबरे, लसूण वापरल्याने पदार्थांना येणारी एक वेगळी चव मला लग्नानंतरच कळली. लग्न झाल्यावर एकदा गावाला गेलो होतो तेव्हा सासूबाईंनी बनवलेल्या ह्या पदार्थाशी ओळख झाली. ह्या पदार्थाची गंमत म्हणजे, त्याच्या नावात जरी मास असले तरी त्याच्यात खरे म्हणजे मास घालातच नाहीत. हा शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे. गावाला कधी कुठे काही कार्य किवा मंगल काही घडले की हा पदार्थ बनवला जातो. खूप रुचकर पदार्थ आहे आणि शक्यतो तांबडा रस्सा आणि भाकरीबरोबर खावा (बाजरीची किव्वा ज्वारीची).

साहित्य-
वडीसाठी-

चण्याचे पीठ/ बेसन -२ वाट्या


१ वाटी सुके खोबरे बारीक चिरलेले
१/२ वाटी तीळ
३ मोठे कांदे- बारीक चिरलेले
हिरव्या मिरच्या-३
जिरे
लाल तिखट
२-३ अखे लसूण सोललेले
काळा मसाला
तेल
पाणी
मीठ
हळद

तांबडा रस्सासाठी

1/2 वाटी सुके खोबरे बारीक चिरलेले

2 मोठे कांदे- बारीक चिरलेले
पाणी
1 अखे लसूण सोललेले 
कदिपत्ता
हिरव्या मिरच्या, 
लाल तिखट 
जिरे
हळद
मीठ 
तेल
कृती-

१. एका कढईत थोडेसे तेल गरम करून त्यात खोबर्‍याचे तुकडे लाल भजावे. ते बाजूला काढून उरलेल्या तेलात त्याच्या पाठोपाठ तीळ आणि कांदा वेग वेगळे भाजून घ्यावे.
२. लसूण, लाल तिखट, काळा मसाला, हिरवी मिर्ची,हळद, मीठ घालून हे भाजलेले पदार्थ मिक्सर मधून किव्वा पाट्यावर वाटून घ्यावे. हे वाटण बाजूला काढून ठेवावे.
३. आता एका मोठ्या पातेल्यात जिर्याची, फोडणी घालून त्यात पाणी घालून आधण ठेवावे.
४. पाण्याला उकळी आल्यावर त्यात थोडे लाल तिखट,हळद, मीठ आणि बेसन घालून खूप फेतवे.
५. थोडा वेळ झाकण ठेऊन त्याची चांगली उकड होऊ द्यावी
६. उकड झाली की ती बाहेर काढून थोडी गरम असतानाच पटकन केळीच्या दोन पनांमध्ये किव्वा दोन प्लास्टिकच्या कागदानमध्ये थोडी घेऊन, त्याची जमेल तेवढी पातळ पोळी लटावी.
७. वरचा कागद किवा पान उचलून त्यावर तयार केलेले वाटण चांगले पसरावे.
८. खालचा कागद अलगद उचलून मोडत मोडत त्याला त्रिकोणी आकार येईल असे आलुवडी साठी करतो तसे घट्ट रोल करत जायचे.
९. आता हा रोल पेपर मधे बाहेर आलेला असेल तेव्हा त्याला आडवे आळुवडी सारखे कापायचे.
१०. तांबडा रस्सा बनवण्यासाठी खोबरे, कांदा, तेलात वेग वेगळे भाजून त्यात हिरव्या मिरच्या, लाल तिखट,हळद आणि लसूण घालून वाटून घ्यावे. मग एका कढईत जिरे, कदिपत्ता, काळा मासला घालून फोडणी करावी व त्यात हे वाटण घालावे आणि पाणी टाकून उकळवावे. चवीपुरता मीठ घालावे.
११. ह्या वड्यांवर थोडा तांबडा रस्सा टाकून त्या भाकरी बरोबर खाव्यात.

जगप्रसिद्ध- मोरोक्कन सूप


जगात प्रसिद्ध असे मोरोक्कन सूप आज आपण बघुया.

त्या साठी लागणारे सहित्य-


काबुली चणे- 1 वाटी रात्रभर भिजवलेले
कॉर्नफ्लवर किवा मैदा- 1 वाटी
शेवया- 1/2 वाटी
मोठे टोमॅटो- 4 नग बारीक चिरलेले
मोठे कांदे- 2 नग बारीक चिरलेले
हिरवी मिरची- ठेचलेली
मीठ
काळ्या मिर्‍याची पूड
आले लसूण पेस्ट- 2-3 चमचे
शाकाहारीसाठी- 200 ग्रॅम पनीर/ सोयबीन नगेटटस
मासाहारीसाठी- 200 ग्रॅम चिकन/ मटनाचे तुकडे
तेल
पाणी
कोथिंबीर
थिक क्रस्टी ब्रेड- 1 पुडा सूप बरोबर खायला

कृती-
1. एका बोल मधे कॉर्नफ्लवर किव्वा मैदा घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून घट्ट पेस्ट करून ठेवायची.

2. एका भांड्यात थोडेसे तेल गरम करायचे
3. तेल गरम झाले की त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यायचा.
4. त्यात ठेचलेली हिरवी मिरची व आले लसूण पेस्ट टाकून थोडा वेळ चांगले परतायचे
5. बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे.
6. थोडे शिजल्यावर त्यात 1-2 चमचे काळी मिरी पूड घालायची.
7. त्यात 1 लीटर पाणी घालायचे आणि चांगली उकळी येऊ द्यायची.
8. उकळी आल्यावर त्यात तयार केलेई पेस्ट, कबुली चणे आणि शेवाया घालायच्या.
9. जरा वेळ झाकण ठेऊन हे शिजू द्यायचे.
10. मग त्यात चिकन/ मटण/ पनीर/ सोयबीन चे तुकडे घालून मीठ घालून चांगले शिजू द्यायचे.
11. 10 मिनिटे शिजू दिल्यावर त्याला एका सर्विंग बोल मधे नीट ढवळून ओतावे.
12. वर कोथिंबीर किव्वा पार्सले बारीक चिरून टाकावी.
हे सूप सर्व करताना त्याच्या बरोबर क्रस्टी ब्रेड हवाच.
हा ब्रेड ह्या सूप बरोबर खाल्ला जातो.