Saturday, November 17, 2012

संघर्ष- कोणाचा कसा?


पाच वर्षांपूर्वीची गोष्ट, पुण्याच्या एका खाजगी कंपनीत काम करताना पुण्याहून मुंबईला आपल्या घरी शिवनेरी मधून जात होते. माझ्या बाजूला एक विवाहित स्त्री होती, तिचे नाव लक्ष्मी. ती मूळची तमिळनाडू ची होती. आमच्या खूप गप्पा रंगल्या, तेव्हा कळले की ती पुण्याला आयबीएम या कंपनीत सॉफ्टवेर डेवेलपर होती.
मी तिला सहज विचारले, " मग मुंबई ला काय, ऑफीसच्या कामासाठी का?"
लक्ष्मीने थोडा वेळ थांबून मग उत्तर दिले " नाही, तिथे माझे मिस्टर असतात."
"ओके, मग ते तीथे आहेत का नोकरीला?" मी विचारले.
"हो, तिथेच असतात, ते रीलायन्स मध्ये प्रॉजेक्ट मॅनेजर आहेत. आणि मी पुण्याला." ती सांगू लागली. "मी त्यांना महिन्यातून एकदा भेटायला येते, कामातून वेळ काढून. नाहीतर मग ते येतात मला भेटायला पुण्याला. माझे माहेर तामीळनाडू मधे आहे आणि सासर आंध्रप्रदेश मध्ये. तामीळनाडूला नमक्कल नावाचा एक जिल्ला आहे तेथे आमचे गाव आहे. तिथे मला दर पंधरा दिवसांनी जावे लागते, माझ्या मुलीला भेटायला, ती २ वर्षांची आहे.तिला मी माझ्या आईकडे ठेवले आहे सांभाळायला. आम्ही दोघे नोकरी सांभाळून तिला नाही बघू शकत. माझी आई तिची खूप छान काळजी घेते. खूप आठवण येते तिची, तिच्यासाठी नेहमी छान छान कपडे, खेळणी घेऊन जाते. हे पंधरा दिवस म्हणजे मला पांढरा वर्षांसारखे वाटतात. लवकरच मी मुंबईला ट्रान्स्फर घेणार आहे, म्हणजे आम्ही एकत्र राहू शकू मुली बरोबर, आणि अजुन दोन वर्षांनी मला वर्क फ्रॉम होम ऑपशन पण मिळेल, मग काही चिंताच नाही."
"ओके, छान.... " मी मान डोलवत म्हणाले. तिची हकीगत ऐकल्यावर मला जरा सुन्न झल्यासारखे वाटले. मी काही आणखी खोलात नाही शिरले. मला तिचे खूप नवल वाटत होते, कौतुक वाटत होते. किती धाडसी, महत्वाकांक्षी स्त्री होती ती.पण मनातल्या एका कोपर्‍यात तिच्या जीवनाची कीव येत होती. आपला वेळ करियर् आणि कुटुंबात वाटून घेताना किती यातना होत असतील तिला. लग्न झालेय, मुलगी झालीय, पण तरीही त्याचा पूर्ण उपभोग ती घेऊ शकत नव्हती. किती संघर्ष होता तिच्या जीवनात, कोणाचा कसा, कोणाचा कसा?

Wednesday, November 7, 2012

दिवाळी बद्दल काही धार्मिक माहिती - संपूर्ण चातुर्मास या ग्रंथामधून


आश्विन वद्य द्वादशी पासून कार्तिक शुद्ध द्वितीये पर्यंत दिवाळी हा महोत्सव साजरा करतात.

वसुबरास- याला "गोवत्स द्वादशी" असे म्हणतात. गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून त्यांची पूजा करतात. वसू म्हणजे द्रव्य या दिवशी. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढली जाते. गाईची पूजा करताना तिच्या पायावर पाणी घालून मग हळद कुंकू लावून तिला अक्षता-फूल घालून ओवाळतात. तिच्या समोर पूरण- वगैरे सर्व पदार्थ केळीच्या पानावर  खायला ठेवतात. या दिवसापासून पणत्या लावण्यास सुरूवात होते.







धनत्रयोदशी- या दिवशी घरातील बायकांची न्हाणी करतात. लोक घरातील पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंध्याची हत्यारे, सोने- नाणे यांची पूजा करतात. धणे-गुळाचा नैवेद्य दाखवतात. या दिवसापासून आकाशकंदील लावला जातो. या दिवशी यमदीपदान करावे लागते. दक्षिण दिशेला तोंड करून कणकेचा एक दिवा लावायचा. यामराजाची अवकृपा होऊ नये म्हणून हे करावे लागते.


नरक चतुर्दशी- नरकासूर नावाच्या राक्षसाचा संहार श्री कृष्णाने आश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी केला. म्हणून याला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी सूर्योदयपूर्वी स्नान करावे. आंघोळ करताना उटणे, तेल, तिलाची पूड अंगाला लावावी. अर्धि आंघोळ झल्यावर आंघोळ करणार्‍याला औक्षण करावे. जो कोणी या दिवशी अभ्यांगस्नान करत नाही तो नरकात जातो असे म्हणतात.

लक्ष्मी- पूजन- फार पुर्वी बळी नावाचा राजा होऊन गेला. तो खूप श्रीमंत व पराक्रमी होता. त्याने आपल्या श्रीमंतीच्या जोरावर सर्वा देवांना व लक्ष्मीला सुद्धा कोंडून ठेवले. त्या वेळी श्री विष्णू ने वामनाचे रूप धरण करून  त्रिपद भूमीचे दान मागितले. आणि लक्ष्मीसह सर्व देवांची सुटका केली तो हाच दिवस. व्यापारी लोकांचे हिशेबाचे नवीन वर्षा या दिवसानंतर सुरू होते. या दिवशी पाटावर रांगोळी काढून तंदूळ ठेवावेत . त्यावर वाटी किव्वा तबक ठेवावे.  त्यात सोने चांदी, मोती, रुपया ठेवावे. त्यांची पूजा करावी. लाह्या, पंचामृत नैवेद्यात ठेवावे. 









पाडवा- बलिप्रतिपदा- बळीची दानशूरता पाहून वामनाने त्याला पातालाचे राज्य दिले. त्याची सेवा करण्यासाठी वामन बळीचे द्वारपाल झाले.. तोच हा दिवस. हा दिवस साडे तीन मुहूर्तां पैकी एक आहे. व्यापारी लोकांचे नवीन वर्ष या दिवशी सुरू होते. या दिवसिह पत्नीने पतीचे औक्षण करायचे असते. पतीने पत्नीला एखादा दागिना किव्वा प्रपंचाला उपयुक्त अशी वस्तू द्यायची असते. या दिवशी कन्याही आपल्या पित्याला ओवाळते. या दिवशी सगळे आपला आपला दिवाळीचा फराळ घेऊन  एक मेकांच्या घरी जातात .

भाउबीज- यमद्वितीया- या दिवशी यमराजाची बहीण म्हणजे यमुना हिने आपल्या भावला यमाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते. म्हणून हा सण भाउबीज म्हणून साजरा करतात. या दिवशी भो बहिणीला भेटवायास जातो. बहीण भावला ओवाळते. आपल्या शक्तीनुसार तिला प्रतीक म्हणून एखादी भेटवस्तू देतो. भाउ नसेल किव्वा जवळ नसेल तर चंद्राला ओवळून घायचे. 
  

Tuesday, November 6, 2012

खंडोबाचा धडा!!!

आमचे कूलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा. थंडितल्या एका रविवारी मी सहकुटुंब कूलदैवतच्या दर्शनाला गेलो होतो. रविवार हा खंडोबाचा वार असल्यामुळे तिथे खुप गर्दी असणार हे आम्हाला ठाऊक होते, आणि म्हणून आम्ही सकाळी लवकर निघालो, त्यात जेजुरीचा गडही भराभर चढलो. पण वर चढल्यावर कळले की गर्दी काही कमी नव्हती. जेजुरीला व्हीआयपी पास पण मिळतो पण त्यात सुधा रांग, ही कल्पना मला आधीच होती, म्हणून मी माझ्या ओळखीच्या मित्राकडून ट्रस्टच्या एका मोठ्या पादविवाल्या माणसाचा मोबाइल नंबर मिळवला होता. आमचे चिरंजीव अगदी ६ महिन्यांचे असल्यामुळे ही सोय सुद्धा मी आधीच केली होती. बायकोला हे काही पटले नव्हते, कितीही उन असो किव्वा रांग असो, दर्शन रांगेत उभे राहूनच घ्यायचे, तेव्हाच आपल्याला खरे दर्शन केल्या सारखे वाटेल आणि देवाची कृपा होईल, असे तिचे म्हणणे होते. मी काही तिचे ऐकले नाही, त्या  ट्रस्टच्या माणसाला फोन लावला, देवाच्या दर्शनाला शॉर्टकट मारायला मला जरा सुद्धा चुकल्यासारखे नव्हते वाटत. त्या माणसाशी बोलणे झल्यावर थोड्यावेळाने एक भट्जी देवळाच्या बाहेर आला. आम्ही व्हियायपीच्या रांगेत उभे होतो. त्याने माझे नाव घेतले आणि हाताने इशारा करत मला पुढे बोलावले. मी आणि माझ्या पाठी मागे बायको, बहीण तिचे यजमान आणि तिची मुले अशी लांब रांग लागली. आम्ही सगळे रांगेतल्या माणसांना बाजूला करत पुढे जाऊ लागलो, ते आमच्याकडे रागाने पाहु लागले. पण मी मोठ्या दिमाखात सगळे कुटूंब घेऊन पुढे सरकत राहिलो. रांगेतल्या २-३ बायका माझ्याबद्दल बोलत होत्या "कोण आहे हा नालायक माणूस? ... आपण इथे इतका वेळ उभे आहोत रांगेत. आणि हा सगळ्यानंना घेऊन घुसतोय मधे." माझी बायको, बहीण घाबरल्या होत्या. अत्यंत स्वार्थी आणि बेफिकीर होऊन आम्ही एकदाचे दर्शन घेऊन मोकळे झालो. 
 बहिणीला मुंबईला परतायचे होते लवकर म्हणून उतरायची पण घाई होती. खाली उतरताना एका तरुणाला माझा जोरात धक्का लागला आणि तो पडला. मी त्याला उठवायला मदत केली. शेवटी खाली उतरलो मग. बहीण आणि तिच्या घरचे मुंबई ला बस मधून रवाना झल्यावर मी आणि माझी बायको मुलाला घेऊन पुण्याच्या बसमधे चढलो. त्यात सुधा गर्दी होती. पण बायकोला  लगेच जागा मिळाली मी मात्र उभाच होतो. टीसी जवळ येऊ लागला तसे मी ट्राउज़र च्या खिष्यात हात घातला, पाकीट काढायला. घाईघाईने पाकीट उघडले, पण पाकिटातले पैसे गायब होते. मला लगेच कळले की त्या मुलाने खूप हुशारीने माझ्या पाकिटातले सगळे पैसे मारले होते. पण नशिबाने माझ्या पाकिटटले एटीएम कार्ड त्याने नेले नाही. बायकोला तिकीट काढलायला सांगितले, पण तिच्याकडेही थोडेच पैसे होते. त्यातूनच आम्ही तिकिटे काढली. फक्त दहा बारा रुपये उरले होते तिच्याकडे. नवरा बरोबर आहे, मग चलती फिरती बॅंक आहे, मग कशाला हवी पर्स आणि पैसा, म्हणून मी काही तिला पैसे दिले नव्हते. माझा शहांपणा मला नडु लागला होता. तिला मे उभ्या उभ्या सगळी हकीगत सांगितली. ती लगेच मला टोमणा मारत म्हणाली " सांगितले होते, असे दर्शन नाही घ्यायचे, मिळाले ना फळ आता?" आता मला चुकल्यासारखे वाटू लागले होते.

बस मधून खाली उतरलो तेव्हा बायकोचा मूड काही चांगला नव्हता. जवळ एक एटीएम होते तिथे धाव घेतली आधी, तिथेही रांग. माझ्या पुढे ७ माणसे होती. हळू हळू रांग पुढे सरकली मझा नंबर आला तसा मी आत शिरायच्या आधीच एक माणूस पटकन आत मधे घुसला. कुठून आला होता काय माहिती, पण अचानक आला पाठीमगून. तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात गेलो होती. बायको हे सगळे नुसते पाहत होती. तिला पण आश्चर्य वाटले होते हे पाहून. थोड्या वेळाने तो माणूस पैसे काढून बाहेर आला आणि न बघताच पुढे चालू लागला. मी आपला ओरडत राहिलो " ओ काय हे? ही काय पद्धत आहे का? तुम्हाला काही शिस्त आहेत की नाही?" तो माणूस काही न बोलता खूप लांब निघून गेला होता आणि मी घसा फाडत उभा होतो. पाठीमागची माणसे पण काही तरी पुटपुटत त्या माणसाला रागाने पाहत होती. हे सगळे क्षणात झले होते, पण मी काही करू शकलो नाही. माझ्या बायकोचे म्हणणे आता मला पटले होते. खंडोबाने मला चांगलाच धडा शिकवला होता.
Me Marathi!

Monday, November 5, 2012

मराठीक्रियेटिविटी: सासू सून आणि संसार !!!

मराठीक्रियेटिविटी: सासू सून आणि संसार !!!: आपले माहेरचे घर सोडून सून आपल्या घरात येऊन एका नवीन आयुष्याची सुरूवात करते. घरात प्रवेश करायच्या आधी तिला माहेरी खूप सल्ले दिले जातात. जस...

सासू सून आणि संसार !!!


आपले माहेरचे घर सोडून सून आपल्या घरात येऊन एका नवीन आयुष्याची सुरूवात करते. घरात प्रवेश करायच्या आधी तिला माहेरी खूप सल्ले दिले जातात. जसे की “सासुचे ऐईक!! सासुला मान दे!!” वगैरे वगैरे… लग्नाधीच तिला सासू या शब्दाची खूप भीती बसवली जाते. सुनेने सासू सासर्‍यांचा आई वडील म्हणून स्वीकार करावा अशी सगळ्यांची अपेक्ष्या असते आणि ते ती स्वच्छ मनाने करते. सासरी नवर्‍यानंतर तिचा सगळ्यात जास्त संपर्क हा सासूशी असतो. सुनेला जसे सगळे सोडून यावे लागते तसेच सासुला सुद्धा खूप मोठा मानसिक बदल सहन करावा लागतो. तिने आपल्या मुलाला लहानाचे मोठे केले असते. इतके वर्ष तो तिच्या मार्गदर्शनाखाली असतो. ती त्याच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची स्त्री असते. सून आल्यावर मुलाच्या आयुष्यातले आपले महत्व कमी तर होणार नाही अशी भीती तिला सतत वाटत राहते.
Image
सुनेने जर घरात स्वताहाला सामावून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले तर सासूने सुद्धा तिला त्यात साथ दिली पाहिजे. संसारात पदार्पण केल्यावर आपणही चुका केल्या असतील हे तिने विसरू नये. कुटुंबातील इतर सदस्यांसमोर सुनेला कमी लेखले, तिच्या चुका दाखवल्यां तर सुनेचा  आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि संसारात भांडी वाजण्यचि शक्यता वाढु शकते.
सुनेने सुद्धा सासुला आई समजून मोकळेपणाने तिचे मार्गदर्शन घ्यावे, पण सासूने याचा गैरफायदा घेऊ नये.
सुनेने सासूशी जवळीक साधताना तिला काय आवडते काय नाही हे विचारले तर तिला खूप बरे वाटेल. तसेच तिच्यामुळे  आपल्याला आज इतका छान नवरा मिळाला असे श्रेय तिला सुनेकडून मिळाले तर तिला आपले आयुष्य सार्थक झाले असे वाटेल. धून मधून सासूसठी काही तरी भेटवस्तू किव्वा तिला आवडेल अशी वस्तू द्यावी. तिला त्यात नावीन्य मिळेल.
सासूने सुद्धा, सुनेने आणलेल्या भेटवस्तूचे, तिला येण्यार्‍या कलाकौशल्यांचे कौतुक केले पाहिजे आणि तिला त्यात प्रोत्साहन दिले पाहिजे.
सुनेने आणि सासूने एकत्र राहण्यासाठी त्या दोघींनाही खूप तडजोड करावी लागते. पण घरात शांती, सुख आणि समृद्धी राखण्यामध्ये सासूचा खूप मोठा वाटा असतो, घरात आलेल्या सुनेला तिने परकेपणाने न वागावता “हे घर तुझेही आहे. तुला हवे तसे इथे राहा …” असे सांगितले तर सुनेला ते घर आपलेसे वाटेल. सुनेच्या सुखा-दुखात, संकटात तिच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहीले पाहिजे. जेवढे प्रेम आपण सुनेला देऊ तेवढेच किव्वा त्या पेक्षा जास्त ती आपल्याला उतारवयात परत देईल या अशेने तरी सासूने तिच्याशी जुळवून घ्यावे. जर काही बिणसलेच तर दोघींनी नीट विचार करून एकमेकांना समजूत घालावी. ह्यात वयाचे काही नसते, अंतर फक्त पिढीचे असते, स्वभावांच असते , विचारांचे असते हे दोघींनीही आपल्या मनाला पटवून दिले पाहिजे. दोघींनीही एकमेकींचा स्वाभिमान न दुखावता वागले पाहिजे.
शेवटी काय दोन माणसे कधीच सारखी नसु शकतात हे सुधा विसरून चालणार नाही. मग सासू सून पण माणसेच ना.
पण सासूने आणि सुनेने ठरवले तर त्या खेळीमेळिने राहू शकतात आणि संसार आनंदाचा करू शकतात.