Tuesday, March 26, 2013

"या वाला खाउन जावा अस्सल मराठा मासवडी- आमच्या गावाचा पेशल आईटम."


आमचे गाव राजुरी, जुन्नर मधे घाटावर राहणार्‍या मराठ्यांचे हे गाव. शिवरायच्या शिवनेरीजवळ बसलेले, शेतीने समृद्ध, स्वछ, सुंदर. म्हणजे गुजरात्यांच्या किव्वा नॉन-महाराष्ट्रीयांच्या म्हणण्या नुसार, आम्ही तसे पक्के घाटी. मराठ्यांचा एक विशिष्ट पदार्थ म्हणजे मासवडी. मी माहेरची देशस्थ ब्राह्मण आणि सासर ९६ कुळी मराठा. माहेरी तशी तिखट खायची सवय होतीच पण कांदा, खोबरे, लसूण वापरल्याने पदार्थांना येणारी एक वेगळी चव मला लग्नानंतरच कळली. लग्न झाल्यावर एकदा गावाला गेलो होतो तेव्हा सासूबाईंनी बनवलेल्या ह्या पदार्थाशी ओळख झाली. ह्या पदार्थाची गंमत म्हणजे, त्याच्या नावात जरी मास असले तरी त्याच्यात खरे म्हणजे मास घालातच नाहीत. हा शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे. गावाला कधी कुठे काही कार्य किवा मंगल काही घडले की हा पदार्थ बनवला जातो. खूप रुचकर पदार्थ आहे आणि शक्यतो तांबडा रस्सा आणि भाकरीबरोबर खावा (बाजरीची किव्वा ज्वारीची).

साहित्य-
वडीसाठी-

चण्याचे पीठ/ बेसन -२ वाट्या


१ वाटी सुके खोबरे बारीक चिरलेले
१/२ वाटी तीळ
३ मोठे कांदे- बारीक चिरलेले
हिरव्या मिरच्या-३
जिरे
लाल तिखट
२-३ अखे लसूण सोललेले
काळा मसाला
तेल
पाणी
मीठ
हळद

तांबडा रस्सासाठी

1/2 वाटी सुके खोबरे बारीक चिरलेले

2 मोठे कांदे- बारीक चिरलेले
पाणी
1 अखे लसूण सोललेले 
कदिपत्ता
हिरव्या मिरच्या, 
लाल तिखट 
जिरे
हळद
मीठ 
तेल
कृती-

१. एका कढईत थोडेसे तेल गरम करून त्यात खोबर्‍याचे तुकडे लाल भजावे. ते बाजूला काढून उरलेल्या तेलात त्याच्या पाठोपाठ तीळ आणि कांदा वेग वेगळे भाजून घ्यावे.
२. लसूण, लाल तिखट, काळा मसाला, हिरवी मिर्ची,हळद, मीठ घालून हे भाजलेले पदार्थ मिक्सर मधून किव्वा पाट्यावर वाटून घ्यावे. हे वाटण बाजूला काढून ठेवावे.
३. आता एका मोठ्या पातेल्यात जिर्याची, फोडणी घालून त्यात पाणी घालून आधण ठेवावे.
४. पाण्याला उकळी आल्यावर त्यात थोडे लाल तिखट,हळद, मीठ आणि बेसन घालून खूप फेतवे.
५. थोडा वेळ झाकण ठेऊन त्याची चांगली उकड होऊ द्यावी
६. उकड झाली की ती बाहेर काढून थोडी गरम असतानाच पटकन केळीच्या दोन पनांमध्ये किव्वा दोन प्लास्टिकच्या कागदानमध्ये थोडी घेऊन, त्याची जमेल तेवढी पातळ पोळी लटावी.
७. वरचा कागद किवा पान उचलून त्यावर तयार केलेले वाटण चांगले पसरावे.
८. खालचा कागद अलगद उचलून मोडत मोडत त्याला त्रिकोणी आकार येईल असे आलुवडी साठी करतो तसे घट्ट रोल करत जायचे.
९. आता हा रोल पेपर मधे बाहेर आलेला असेल तेव्हा त्याला आडवे आळुवडी सारखे कापायचे.
१०. तांबडा रस्सा बनवण्यासाठी खोबरे, कांदा, तेलात वेग वेगळे भाजून त्यात हिरव्या मिरच्या, लाल तिखट,हळद आणि लसूण घालून वाटून घ्यावे. मग एका कढईत जिरे, कदिपत्ता, काळा मासला घालून फोडणी करावी व त्यात हे वाटण घालावे आणि पाणी टाकून उकळवावे. चवीपुरता मीठ घालावे.
११. ह्या वड्यांवर थोडा तांबडा रस्सा टाकून त्या भाकरी बरोबर खाव्यात.

No comments: