Monday, November 25, 2013

नवरा बायको- एक मजेशीर नाते- एक सुनेहरी आठवण

नवरा बायको- एक मजेशीर नाते- एक सुनेहरी आठवण

सगळ्यात अजब नाते म्हणजे नवरा बायको चे. या नात्यावर किती विनोद केले जातात. किती विचित्र आहे हे नाते. रक्ताचे नाते नसले तरी काही वर्षातच ते इतके दृढ होत जाते.



रस्त्याने एक आजी आजोबा चालले होते. त्यांचाकडे पाहून वाटत होते की आजी आजोबांना सांगत होती " तुम्हाला आठवतेय का मी तुम्हाला असे सांगितले होते? "  आणि ते आजोबा आपली मान डोलवत " हो हो " म्हणत होते. खरच या नात्याची गम्मत म्हणजे नवरा निमुटपणे नेहमी बायकोचे म्हणणे ऐकत असतो. 

आपण नेहमी त्याला  तकरारी सांगत असतो पण तो बिचारा ऐकून घेत असतो. कधी कधी चूक आपलीही असते तरीही तो आपलीच  बाजू घेत असतो. हेच आहे आपल्यावरचे प्रेम, पण आपण तरीही त्याच्या प्रेमावर संशय घेत राहतो. पण हा आपला स्वाभाविक गुणधर्म आहे का? म्हणजे नवऱ्यावर निस्सिम  प्रेम करतो म्हणून आपण ही चूक सारखीच करत राहतो. ह्या नात्यात किती गोडवा आहे. खूप मजेदार आहे हे नाते. कधी आपण या नवऱ्यावर  विजेसारखे कोसळतो तर कधी त्याला एका लहान बाळासारखे प्रेमही करतो. नवराही तसेच वागतो, कधी आपले खूप लाड करतो, तर कधी नकळत आपले मन दुखवतो.  

लहानपणी आजी आजोबांचे एकमेकांवरचे प्रेम पहिले होते. खूप भांडायचे दोघे, पण तरीही एक मेकांशिवाय जेवण सुधा नाही जायचे त्यांना  आजोबा खूप सक्त आणि बोलण्यात बेभान होते, आजीला खूप टोचून बोलायचे पण तरीही आजोबांच्याच आवडीचे जेवण आजी बनवणार, त्यांना अगदी सगळे हातात आणून देणार. ती सुधा आमच्या जवळ त्यांची तकरार करायची. पण खूप गोड होते ते नाते. 

आई बाबा पण किती भांडत असतात, म्हणजे लहानपणापासून असा एकही आठवडा गेला नाही की त्यांचे भांडण झाले नसेल. पण आई कधी  आजोळी गेली, किव्वा कुठे बाहेर गेली की बाबांचे सारखे तिला फोन. त्यांना कर्मत नाही तिच्याशिवाय. 

नवीन नवीन लग्नानंतर एकदा आम्ही ऑफिस सुटल्यावर बाइक वरून घरी जात होतो आणि अचानक काही कारणाने संतोष - माझा नवरा माझ्याशी उगाच वाद करायला लागला, मला कळेच न याला काय झाले. घर जवळ आले तसे त्याने अजून जास्त वाद घालायला सुरुवात केली. मग मी पण काही सोडले नाही वाद घालायला, शेवटी त्याने बाइक थांबवली आणि मला खाली उतरवले. मी सुद्धा अगदी अभिमानाने किव्वा स्वाभिमानाने लगेच खाली उतरले आणि घराच्या दिशेने चालू लागले. मला खूप आश्चर्य आणि वाईट वाटत होते. हा असा का वागतोय?  काय झाले याला? मग मी घरी गेले तर अजूनच चीड आली मला. तो मस्त सोफ्यावर अडवा होऊन टीवी बघत होता, वर मला order  सोडू लागला - पाणी आण, चहा आण, काही खायला दे- वगैरे वगैरे. मला खूप त्रास होत होता आता. पण मी विचार केला कि काही बिनसले असेल कुणाशी आणि आपल्यावर राग काढतोय म्हणून निमुटपणे त्याचे ऐकत होते. मग माझे किचन मध्ये ओट्यावर लक्ष्य गेले तर एक सुंदर बॉक्स  गिफ्ट pack करून ठेवला होता. त्यात सुंदर सोन्याचे कानातले आभूषण होते, आणि मग मला कळले की हा असे का वागतोय. हे लग्नानंतरचे पहिले सरप्राइस गिफ्ट होते. खूप छान होता तो क्षण. मग त्याने कबुल केले की यासाठी तो इतके वाईट वागला आणि मला खाली उतरवून घरी लवकर येउन त्याने हे सरप्राइस अरेंज केले. 



No comments: