Monday, June 29, 2015

पाण्याच्या किव्वा कोल्ड ड्रिंक च्या प्लास्टिक बॉटल चा असा पुनर वापर करून वेस्ट रिसायकल करा.    बॉटल  अशी कापून घ्या

उरलेल्या भागाचा फनेल म्हणून वापर करा. काही पदार्थ पिशवीत असतात आणि त्यांना हवा लागून ते खराब होऊ शकतात, त्यांना  अश्या प्रकारे घट्ट बंद करा. 
किचन मध्ये मांडण्या किव्वा कपाटे अशी लावा

किचन मध्ये डबे, भांडी इत्यादी वस्तू अश्या पद्धतीने  लावल्या तर नीट- नेटकेपणा  तर दिसतो आणि स्वच्छता  ही राहते, तसेच किचन मध्ये काम करणे आपल्याला सोपे जाते.छोट्या बेडरूमचे कमीत कमी सामानात असे नियोजन करा

Sunday, June 28, 2015

वेस्ट रिसायकल- बॉक्स चे पेपर/ मासिक होल्डर

घरात एखाद्या विकत घेतलेल्या वस्तूचा एखादा चपटा बॉक्स  असेल तर तो फेकू नका, तुम्ही त्याचे सुंदर पेपर/ मासिक होल्डर  बनवु शकता  आणि घराची शोभा वाढवू शकता .


साहित्य:

एक चपटा  बॉक्स

चार्ट  पेपर(कुठल्याही रंगाचा )
फेविकोल 
कातर 
न्यूसपेपर(कटिंग साठी )
सजावटीसाठी तुम्ही तुमच्या पसंतीचे समान वापरू शकता 

कृती:

१. बॉक्सला उभे ठेऊन वरचे झाकण कापून टाकावे वं  बाजूला ठेवावे. 


२. न्यूसपेपर घेऊन त्याला बॉक्स च्या मापाइतके वरून थोडेसे वळण देऊन कटिंग करून घ्यावे. मार्कर ने ह्या कटिंग प्रमाणे मार्क करून बॉक्स कट करून घ्यावा.  
३. बॉक्सच्या कापलेल्या झाक्णांना फेविकोल लाऊन ते बॉक्सच्या आत तळाला चिटकवून घ्यावे म्हणजे पेपर होल्डरला उभे राहायचे बळ  येईल. 

४. बॉक्स चार्ट पेपर वर ठेऊन पेन्सिलने मार्क करून घ्यावे वं त्याच्या वळणदार कडांना असे कट द्यावे. मग फेविकोल लाऊन चार्ट पेपर ला संपूर्ण बॉक्स वर चिटकवून घ्यावे. 

५. तयार होल्डरला  हवे तसे सजवा. मी असे सजवले…