जगात प्रसिद्ध असे मोरोक्कन सूप आज आपण बघुया.
त्या साठी लागणारे सहित्य-
काबुली चणे- 1 वाटी रात्रभर भिजवलेले
कॉर्नफ्लवर किवा मैदा- 1 वाटी
शेवया- 1/2 वाटी
मोठे टोमॅटो- 4 नग बारीक चिरलेले
मोठे कांदे- 2 नग बारीक चिरलेले
हिरवी मिरची- ठेचलेली
मीठ
काळ्या मिर्याची पूड
आले लसूण पेस्ट- 2-3 चमचे
शाकाहारीसाठी- 200 ग्रॅम पनीर/ सोयबीन नगेटटस
मासाहारीसाठी- 200 ग्रॅम चिकन/ मटनाचे तुकडे
तेल
पाणी
कोथिंबीर
थिक क्रस्टी ब्रेड- 1 पुडा सूप बरोबर खायला
कृती-
1. एका बोल मधे कॉर्नफ्लवर किव्वा मैदा घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून घट्ट पेस्ट करून ठेवायची.
2. एका भांड्यात थोडेसे तेल गरम करायचे
3. तेल गरम झाले की त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यायचा.
4. त्यात ठेचलेली हिरवी मिरची व आले लसूण पेस्ट टाकून थोडा वेळ चांगले परतायचे
5. बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे.
6. थोडे शिजल्यावर त्यात 1-2 चमचे काळी मिरी पूड घालायची.
7. त्यात 1 लीटर पाणी घालायचे आणि चांगली उकळी येऊ द्यायची.
8. उकळी आल्यावर त्यात तयार केलेई पेस्ट, कबुली चणे आणि शेवाया घालायच्या.
9. जरा वेळ झाकण ठेऊन हे शिजू द्यायचे.
10. मग त्यात चिकन/ मटण/ पनीर/ सोयबीन चे तुकडे घालून मीठ घालून चांगले शिजू द्यायचे.
11. 10 मिनिटे शिजू दिल्यावर त्याला एका सर्विंग बोल मधे नीट ढवळून ओतावे.
12. वर कोथिंबीर किव्वा पार्सले बारीक चिरून टाकावी.
हे सूप सर्व करताना त्याच्या बरोबर क्रस्टी ब्रेड हवाच.
हा ब्रेड ह्या सूप बरोबर खाल्ला जातो.
No comments:
Post a Comment