एकदा वसई ला आई बाबा आणि बहिणी बरोबर एका हॉटेल मध्ये जेवायला गेले होते. हॉटेल च्या बाहेर अचानक बाबांना ऑफिस मधले एक जुने मित्र भेटले. त्यांच्या बरोबर त्यांची मुलगी आणि मुलगा पण उभे होते. वयाने दोघेही लहान होते, मुलगी कॉलेज मध्ये आणि मुलगा शाळेत शिकत असावेत. होते तितका वेळ तोंडात सतत चिंगम चघळत होते दोघेही. बाबांशी ओळख करून देताना सुद्धा ती दोघेही चिंगम चघळत मिश्किलने हसत बाबांकडे पाहत होती. आम्हाला थोडे विचित्रच वाटले हे वागणे. आम्ही निघालो तिथून लवकरच, नंतर आमच्यात हीच चर्चा झाली कि किती बेशिस्त आहे हि आजची पिढी. नमस्कार चमत्कार किव्वा हाय सुद्धा नाही केला त्या दोघांनी. किती बदल झाला आहे पुढच्या पिढी मध्ये. हीच ती सो कॉल्ड नवीन पिढी आहे का? काय आहेत यांचे आचार विचार? हि पिढी स्वार्थ, कपट आणि किती उद्धट विचारांनी घडवली गेली आहे. यांचात आपल्यासारखे शिष्यत्व, बालिशपणा का नाही राहिला? पण यांना घडवले कोणी? नंतर तिथेच टीवीवर बलात्कार ची बातमी झळकली त्यात बलात्कारी होते सगळे अल्पवयीन. आमच्या चर्चेने अजून वेगळे वळण घेतले. आजकाल बलात्कारांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. आश्चर्य याचे वाटते कि बलात्कार करणाऱ्यांमध्ये आता अल्पवयीन शालेय, कॉलेज चे विद्यार्थी पण सामील होऊ लागले अहेत. हे का घडतेय? कोण आहे याला जबाबदार?
वसईत घराजवळ एक नावाजलेला कोचिंग क्लास आहे. त्या क्लास च्या बाहेर नेहमी शालेय विद्यार्थी उभे असतात. त्यात जास्तीत जास्त प्रमाण ८वी ते १०वी मधल्या मुलांचे असते. हि सगळी पोरं पोरी घोळक्यात उभी असतात. जवळ जवळ ८० टक्के मुलांच्या हातात मोबाईल किव्वा स्मार्ट फोन असतोच. त्यांचे कपडे, त्यांचे वागणे, बोलणे हे सगळे अगदी टीवी वर असलेल्या जाहिराती , कार्यक्रम आणि नवीन सिनेमाने प्रभावित असते हे लगेच आढळते. आजच्या ह्या पिढीला पाश्चात्य संस्कृती कडे ओढून नेणारे सगळ्यात मोठे श्रय हे टीवी वर च्या जाहिराती आणि सिनेमा मध्ये वाढलेल्या अशलीलपणालाच दिले पहिजे. त्याच मुळे भारतात सध्या च्या युगात व्यभिचार, लैंगिक शोषण आणि बलात्कार सारख्या घटना सारख्या घडू लागल्या आहेत.
टीवी वर च्या अनेक जाहिरातींमध्ये ते विशिष्ठ उत्पादन हे पुरुष वं स्त्रिया एकमेकांना आकर्षित करण्या करिता वापरू शकतात असे स्पष्ट पणे दर्शवले जाते. उदाहरण घ्यायचे झाले तर dio स्प्रे, टूथपेस्ट, पावडर चा वापर पुरुष वं स्त्रीया एकमेकांना आकर्षित करायला वापरावे असे त्यांच्या जाहिरातीत दर्शवले आहे, कॉलेज मध्ये किव्वा शाळेत मुलगा मुलीला चॉकलेट देऊन तिला आपल्या जवळ करू शकतो, स्त्रियांनी सौंदर्य प्रसाधने केवळ पुरुषांना घायाळ करायला वापरावी, नीट नेटके राहायला नव्हे. गर्भनिरोधाकांच्या जाहिराती खुलेआम दिवसभर दर्शवल्या जातात, आणि अगदी स्पष्टीकरणा सकट, काही जाहिरातींमध्ये तर चक्क अशालील घाण चलचित्रांचा वापरही केला जातोय. म्हणजे एकंदर तुम्ही जे काही कराल वापराल, त्याचे उद्देश्य एकच आहे ते म्हणजे आकर्षण असे या नवीन पिढी ला सांगायचे असते का जाहिरातीतून.
यंदा शालेय नवतरुणींवर हॉट pant आणि अर्धांग उघडे ठेवणाऱ्या कपड्यांचा खूप प्रभाव आहे. सिनेमातल्या ताराकांसारख्या बिनधास्त आणि सुंदर राहण्याचा तंतोतंत प्रयत्न करतात. पण असे कपडे घालण्यामागची त्यांची नक्की काय भावना आहे हे आधी त्यांनी ठरवावे. "मुलाच्या बरोबरीने आम्ही सुद्धा बर्मुडा घालणार अंगाचे प्रदर्शन करणार "अशी भावना आहे का? कि आपले पाय शरीर किती सुंदर आहेत हे त्यांना दाखवायचे आहे? मुलगी आणि मुलगा हे सगळ्या दृष्टीने बरोबरीचे आहेत त्यात काही वाद नाही. पण निसर्गाच्या दृष्टीने त्यांच्यात काही प्रमाणात फरक तर आहेच. आणि तो आपण नाकारू नाही शकत .
हे सगळे टीवी, आणि नवीन सिनेमे यांचेच तरुण पिढीला दिलेले आदर्श अहेत. आपण ज्या पिढीत होतो ती नशीबवान होती आणि आपल्या आई वडिलांची तर अजूनच नशीबवान होती. पाश्चात्य संस्कृती मध्ये विलीन होत चाललेली ही पिढी आपले संस्कार, आपली हिंदू संस्कृती विकून आपल्या देशाला काय भविष्य देणार काय माहिती. आपल्या सुंदर पुरातन संस्कृतीचे स्थानक सोडून हि वेगवान वेस्टर्न एक्स्प्रेस थोडी हळू जाईल आणि येताना फक्त चांगले आदर्श घेऊन येईल का?

No comments:
Post a Comment