Tuesday, October 7, 2014

Please Stop!!! - Kashta Saree and Maid Service wrongly linked.


I don't understand why there is a confusion in some non- maharashtrians that a maid is supposed to wear only  kashta saree. Does it mean that women who are serving as maids are always Maharashtrians? Recently I came across a post on Facebook and Whatsapp showing a maid dressed in a kashta saree. The picture was actually showing indignity towards the kashta saree and service of a maid, and a person working as a maid has no Self-esteem. Madhuri Dxit was portrayed as a maid in one commercial wearing kashta saree too. Why? I have come across two to three incidents in Mumbai where Maharashtrian women wearing Kashta saree were misinterpreted as maids and asked without complete knowledge about them, "Ghar kaam ke liye chahiye? mahine ka kitna lengi?" and similar questions. 


I think people who have such misunderstanding about kashta saree should note that Kashta  Saree is a nine yarded saree and a  typical maharashtrian dress that is worn by many women in rural maharashtrian areas and some old women in urban areas even today, depicting the Maharashtrian culture. In fact, Rani Lakshmi Bai of Jhansi, Rajmata Ahilyabai Holkar of Indore and Veermata Jijabai of Maharashtra were the great women rulers belonging to Maratha Warriors, draped in a nine yarded  Kashta saree. Savitribai Phule, an Indian social reformer also used to wear a kashta saree.  My Grandmother, Mother in law too wear a Kashta saree. A kashta saree is also worn by some young maharashtrian women on auspicous occasions like Marriage Ceremony, Festivals, Poojas, Hom Havan Etc. Kashta sarees are available in various materials today, Silk namely - Paithani and Narayan Peth, Cotton, Polyster, Terryline. Paithani and Narayan peth are the most expensive varieties in Kashta saree.  So before posting such pictures or ads it is Important to note that a maid, or housemaid or maidservant, is a person employed in domestic service, but  no less than a person earning for his/ her own livelihood and a female maid can be seen in many other outfits too, she can wear a punjabi suit, a chaniya choli, a six yarded saree, western outfit etc. 
Saturday, August 23, 2014

फोटोग्राफी- अबू धाबी मध्ये संध्याकाळ

फोटोग्राफी- अबू धाबी मध्ये संध्याकाळमटर- पनीर पालक कचोरी

मटर- पनीर पालक  कचोरी 

साहित्य

सारण बनवण्यासाठी  

१ वाटी पालक चिरलेला 
१ वाटी मटार 
१ सिमला मिरची चिरलेली 
२०० ग्राम पनीर कुस्करलेले 
१ चमचा धने- जिरे पूड
काळी मिरी पूड चवीपुरता 
मीठ चवीपुरता
हळद 
तेल 

कवर बनवण्यासाठी 
थोडे घट्ट मळलेले गव्हाचे पीठकृती

१. कढईत  २ चमचे तेल गरम करावे, त्यात मटार, पालक आणि पनीर आणि सिमला मिरची  घालून ते मिक्स करून घ्यावे व शिजवावे. 
२.  मग त्यात  काळी- मिरी पूड, हळद, धने जिरे पूड व मीठ घालून मिक्स करावे. 
३. मग घट्ट कणकेच्या  बारीक छोट्या पुर्या लाटून त्यात हे सारण भरून मोदक किव्वा कचोरी तयार कराव्या.
४. कढईत  मंद आचेवर तळण्याकरिता  तेल उकळवायला  ठेवावे.  
५. त्या तेलात ह्या कचोर्या सोडून त्या चांगल्या लाल होइस पर्यंत तळून घ्याव्यात. 
६. तयार कचोऱ्या  सॉस किव्वा केचप बरोबर खायला द्याव्या. 

शाळेतल्या काही सुखद आठवणी


आता काही दिवसांनी शिक्षक दिन असतो तेव्हा वाटले आपल्या शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल काही लिहावे.  शाळा पूर्ण होऊन  बरेच  वर्ष झाले तरी शाळेतल्या आठवणी अजूनही तरुण आहेत. काही सुखद आठवणी रोजच्या धकाधुकीच्या जीवनात कोरड्या पडलेल्या मनाला  ओले करून जातात. शाळेतली शिस्त सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला त्या काळात प्रिय असतात. आपले आणि आपल्या वर्गमित्रांचे निरागस, निःस्वार्थ, चंचल आणि निरपेक्ष मन आता मोठे झाल्यावर खूप हवे हवेसे वाटते. जीवनात क्षणोक्षणी शिक्षकांनी आणि गुरुजनांनी आपल्याला दिलेले ज्ञानामृत आणि लावलेली शिस्त म्हणजे एक असे अमुल्य धन आहे जे घेऊनच आपण आजवर मोठे झालो आहोत.

मी मनातील अशीच एक सुखद आठवण इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
वर्गात चालू असणारा गोंधळ टीचर येताच क्षणात शांत व्हायचा. मित्र मैत्रिणींच्या गप्पा टप्पा अचानक बंद व्हायच्या. मग टीचर शिकवायला लागले की लक्ष्य द्यायचे आणि लक्ष्य लागत नसेल तर हळू आवाजात  मैत्रिणींशी बोलत बोलत वेळ काढायचा. तरीही वेळ जात नसेल तर मग कागदावर किव्वा बेंचवर पेन ने एक्स-झिरो खेळायचे. मग टीचर ने जर नोट्स  लिहून काढायला सांगितल्या तर वही उघडून ते  म्हणतील  ते लिहित जायचे. ते काय म्हणतायत ह्यात आमचे क्वचितच लक्ष्य असायचे. शिक्षक चालता चालता पुस्तक वाचत आपल्या जवळून जायचे तेव्हा मनात धडधडायला व्हायचे. शाळेतील शिक्षीकांबद्दल आम्हा मैत्रिणींना विशेष वाटणारी गोष्ट म्हणजे रोज त्यांच्या साड्या निरखून साड्यांचे कौतुक करावे  त्या काळात शिक्षिका साड्याच नेसत  असत, त्यामुळे  त्या आपल्या आईसारख्याच  वाटायच्या. नोट्स काढताना मन लिहण्यात गुंग असायचे  आणि समजा  शिक्षिका आपल्या बाजूने जाताना तिचा पदर आपल्या माथ्यावरून स्पर्श करून  गेला तर मनाला खूप सुखद वाटायचे. कारण शिक्षिका म्हणजे आईची प्रतिमा, आणि तिचा पदर म्हणजे जसा आईच्याच मायेचाच पदर.


शाळेतील परीक्षेत, कला-क्रीडा महोत्सवात टीचरने दिलेले प्रोत्साहन आणि पाठींबा  पुन्हा कधीही मिळत नाही. शालेय दिवस पुन्हा का नाही मिळत? शाळेतील मित्र मैत्रिणींसारखे सखे सोयरे पुन्हा कधी का मिळत नाही? अशी हूरहूर मनाला नेहमी लागत राहते आणि राहणार. 

Wednesday, March 12, 2014

वांग्याचे काप आणि सलाड

वांग्याचे काप आणि सलाड 

वांगे खूप कमी लोकांना आवडते. त्यामुळे त्याची भाजी करण्या ऐवजी असे काप करून थोडे फळे भाज्या सजवून लहान मुलांना खायला देऊ शकतो. 

लाल भाताचे फायदेपांढरा भात लाल भातातूनच तयार केला जातो. या प्रक्रिये मध्ये लाल भाताचे पोलीशिंग केले जाते. ज्यामुळे लाल भातातून अनेक मिनरल व जीवनसत्व कमी होतात. आपल्या देशात लाल भाताची पेज, भाकरी इत्यादी पण खाल्ली जाते. लाल भात पांढऱ्या भातापेक्षा खूप पौष्टिक आहे, कारण यात फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे चावायला त्रास होऊ शकतो. फायबर मुळे पचनक्रिया व्यवस्थित होते वं  वजन नियंत्रणात राहते. लाल भाताचे फायदे
  • रक्तातील कोलेस्ट्रोल नियंत्रणात आणते 
  • वजन कमी करण्यात किव्वा नियंत्रणात मदत करते 
  • पांढऱ्या  भातातून काढलेले जीवनसत्व ब यात असते ज्या मुळे  त्वचा ताजी दिसते. 
  • Magnesium  नावाचे मिनरल यात आपल्या शरीराला लागणाऱ्या डेली रिकमेंडेड व्ह्याल्यू  म्हणजे DRV इतके असते ज्या मुळे आपल्या शरीरातील  पचनक्रिया व श्वसनक्रिया निट चालतात. 


Tuesday, March 11, 2014

कलाकृति -क्रोशाने तयार केलेले श्री गणेशाचे दोन नमुने

कलाकृति -क्रोशाने तयार केलेले श्री गणेशाचे दोन नमुने
अशा कलाकृती घरात फ्रेम करून भिंतीला लावल्यावर घराची शोभा वाढवता येते. 

Tuesday, February 25, 2014

सकाळ म्हणजे दिवसाची सुरुवात....

सकाळ म्हणजे दिवसाची सुरुवात, आणि सकाळ चांगली गेली की पूर्ण दिवस मग चांगलाच जाणार याची मला खात्री पटली आहे. सकाळ म्हणजे कशी स्वच्छ आणि सुंदर वाटते. सकाळी उगवणारा सुर्य आपल्या डोळ्यांवरची झापड तर काढतोच पण आपल्या किरणांमधून तो आपल्याला उर्जा देत असतो. ही उर्जा म्हणजेच positive energy, हल्ली मी  सूर्योदयाच्या आधी उठते. सूर्योदयाच्या आधीच माझी अंघोळही  आटपते,  आणि मगच चहाचा कप हातात घेते, चहाच्या कपातल्या वाफा जेव्हा चेहर्याला येउन लागतात तेव्हा अजूनच ताजे तवाने वाटू लागते. तेव्हा कळते कि खरच आपल्या संस्कृतीतले काही व्रत नियम खूप विचार करून बनवले आहेत. 

सकाळी खिडकीत बसून चहा पिताना मग हळू हळू बिल्डींगच्या मागून डोकावणाऱ्या सूर्याला पहायचे, असे वाटते की तो आपल्याला, "हाय, गुड मॉर्निंग!!!"  म्हणत म्हणत आकाशात प्रकाश पसरवत प्रवेश करतोय. 
सकाळी चालू होणारी रस्त्यावरची वर्दळ, गाड्यांचे आवाज, पाखरांचा किलबिलाट, माणसांची गर्दी …व्वा!!!!काय मस्त आहे हा वेळ. पूर्ण उर्जेने भरलेला. ह्या वेळेत पृथ्वीवरील सर्व जीवन्स्त्रुष्टीतील उर्जेचे प्रमाण  सर्वात जास्त असेल. ती उर्जा म्हणजे दिवसाची सुरुवात आणि मग दिवसभर आपल्याला तीच उर्जा कामास येते. तेवढ्यातच दारावर पडणाऱ्या पेपरचा आवाज येतो आणि मग ताज्या घडामोडी वाचायला आपण तयार असतो. 
Sunday, February 9, 2014

आज भी याद हैं.…

आज भी याद हैं.…

आज भी याद हैं मुझे,
क्या तुम्हे याद हैं?
वह कुछ पल जो सिर्फ हमारे थे.…

प्यार की  बाते ही सिर्फ होती थी हमारे बिच,
लब्जो को हमारे सिर्फ मुहब्बत की  खुश्बू हुआ करती  थी,
हर सास तुम्हारे लिए लेते थे,
हर पल जीने में तुम्हारी तमन्ना हुआ करती थी.…

आज  का दिन कितना अजीब हैं,
पास होकर भी हममें सिर्फ हम नहीं, सारा जमाना हैं,
लब्जो को हमारे खुदगर्जी की चाह हैं,
सास तो लेते हैं लेकिन, जीने का कहा एहसास हैं?Wednesday, January 22, 2014

Saturday, January 18, 2014

पेपर मेशे - पेपर चे उत्तम रिसायकल

पेपर मेशे - पेपर चे उत्तम रिसायकल

घरात पडलेल्या रद्दीचा,  म्हणजे, मासिक, बातमीपत्रांचे पेपर मेषे ने पुनर्वापर करता येतो.
      पेपर मेषे वास्कला सुंदर डीसाइन केल्यावर


साहित्य-

मैदा व पाणी समान प्रमाणात
पेपर किव्वा मासिक
साचा म्हणून प्लेट, बाउल, ग्लास, बाटली
अक्रिलिक कलर
oil कलर

कृती-

१. मासिक/ पेपरच्या बारीक स्ट्रिप्स फाडून घ्यायच्या.
२. मैदा आणि गरम पाण्याचा लगदा तयार करून घ्यायचा हाच आपला ग्लू असेल ज्याने पेपर एक मेकांना घट्ट चिटकून राहतील.
३. साचा साठी घेतलेल्या वस्तूला खाद्य तेलाने माखावे. एका पेपर वर हा साचा पालथा ठेऊन घ्यायचा.
४. एक एक स्ट्रीप घेऊन त्या ग्लु मध्ये बुडवून या साच्यावर ठेवत जायची.  असे अनेक थर  लावत जायचे.
५. हा मेषे ३-४ दिवस उन्हात वाळवत ठेवायचा. वाळल्यावर लाकडासारखा मजबूत होईल. तेलाचा थर असल्यामुळे तो साच्यापासून आपोआप  वेगळा होईल.
६. वाळलेल्या मेषे वर oil  colour  ने बेस कलर करून घ्यावा. मग त्यावर हवी  तशी अक्रिलिक कलर वापरून डीझाइन  करता येते.

चित्रांमध्ये काही नमुने दाखवले आहेत.बाउल  चा साचा घेऊन तयार किला पेपर मेषे बाटली व प्लेट घेऊन तयार केलेले पेपर मेषे वास्क  आणि wall- पीस 


बाटली चा साचा घेऊन  तयार केलेला पेपर मेषे वास्क  सुकल्यावर असा दिसतो 


Sunday, January 12, 2014

कच्चे धागे


प्रतिक आज शाळेतून परत आला तेव्हा त्याचा चेहरा  खूप हिरमुसलेला होता. कोमल ने काही लक्ष्य दिले नाही.
आईला आपल्या मुलांचे वागणे, त्याचे कारण काय आहे हे ओळखायला काही वेळ लागत नाही. 

कोमलने त्याच्या समोर त्याच्या आवडीच्या नूडल्स भरलेला बाउल ठेवला. त्याचा चेहरा लगेच खुलला. 
मटा- मटा  खात त्याने तो बाउल कधी संपवला तिला कळले पण नाही. मग लगेचच तो बिल्डींग च्या बागेत खेळायला गेला. कोमल बरोबर तिची आई राहत होती. तिला आईचा खूप आधार वाटत असे. तिचे वडील लहानपीच हे जग सोडून गेले होते. 

कोमल ने त्याची स्कूल bag  उघडली. त्यात शाळेचे कॅलेंडर होते ते काढले. त्यावर प्रतीकचा फोटो पाहून तिला खूप बरे वाटले- आपला मुलगा शाळेच्या पहिल्या दिवशी किती रडला होता आता किती मोठा झाला. ८ वर्ष कुठे गेली कशी गेली, आठवले कि अंगावर काटा येतो- कोमल विचार करू लागली. मग तिने कॅलेंडर उघडले. त्यात एक सर्क्युलर लावले होते, स्कूल च्या एन्यूअल फंक्शन चे होते ते. आई वडिलांची सही मागितली होती. आई वडिलांना आमंत्रण दिले होते. कोमलने सही केली आणि कॅलेंडर पुन्हा आत ठेवले. 
४ वर्ष झाले तिचा प्रतीकच्या वडिलांशी म्हणजे कौस्तुभ शी घटस्पोट झाला होता. या चार वर्षात कौस्तुभ एकदा हि त्यांना पाहायला आला नाही. तिने स्वकर्तुत्वावर नोकरी करून प्रतिकला जपत जपत, त्याच्यावर प्रेमाचे पाणी शिंपून शिंपून त्याला मोठे केले होते. प्रतीकची वेळोवेळी होणारी  मनातली घालमेल, त्याची तळमळ तिला कळत होती पण ती काहीही करू शकत नव्हती, फक्त अश्रुचे घोट पिऊ शकत होती. कौस्तुभशी तिचा प्रेम-विवाह झाला होता. सासरच्यांनी तिला कधी आपले समजलेच नव्हते आणि घरातही तिला काही जागा दिली नव्हती. कौस्तुभ अत्यंत मोकळ्या मनाचा, मौज- प्रिय माणूस, हे ओळखायला तिने खूप उशीर केला. संसाराची गाडी हाकताना सविता  त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचा तोल  सरकला, इतका कि आपल्या मुलाला आणि पत्नी ला कायमचा सोडून जाण्याचा कठोर निर्णय तो घेऊ शकला. 
प्रतीकचे लहानपणीचे प्रश्न कोमलला नेहमी अडचणीत टाकायचे- पप्पा का नाही आले? पप्पा कुठे गेलेत? या वर्षी एन्युअल फंक्शनला ते येणार आहेत नं? मला मित्र विचारतात तुझे पप्पा कधीच का नाही दिसत?प्रतिक खेळून परत आला, तेव्हा कोमल स्वयंपाकघरात काम करत होती, तिचा चेहरा पडलेला होता, मुलाच्या प्रश्नांना काय उत्तर देणार अशी चिंता तिला वाटत होती.  तोंड हात पाय धुवून तो हि तिथे आला आणि कोमलला घट्ट  मिठी मारून तिचा मुका घेऊन  म्हणाला, "मम्मी मी आता मोठा झालोय, मी आता तुला नाही विचारणार की, पप्पा का नाही येणार? मला कळते आता. ते आपल्याला भेटायला नाही येत नं  मग काय? आपण दोघे खूप मज्जा करूया. मला आजीने सगळे सांगितले समजावून. आई तू खूप छान आहेस."

कोमल मुसु मुसु रडू लागली, दुःखाने नाही तर आनंदाने, प्रतिक किती मोठा आणि समजूतदार झाला होता, हे तिला आज कळले. तिला खूप भरून आले होते. एका बाजूला कौस्तुभशी कधीही न जुळलेले कच्चे धागे तिला खुटत होते, आणि दुसऱ्या  बाजूला प्रतीकचे तिच्यावरचे वाढणारे प्रेम तिला सुखावत होते.