Sunday, March 31, 2013

परदेशात भारतीय असल्याचा अभिमान असू द्या

परदेशात भारतीय असल्याचा अभिमान असू द्या 

तुम्ही जेव्हा एखाद्या प्रगत देशात जाल तेव्हा भारतीय असल्याचा अभिमान राखा.  एकदा परदेशात  एका ओफ़िशल  पार्टी मध्ये गेलो होतो. तिथे एक युक्रेनियन  स्त्री तिच्या ब्रिटीश नवऱ्या बरोबर  आली होती. जेवायला माझ्या बाजूला बसली होती.
जेवताना गप्पा मारायला लागलो तेव्हा तिने भारताचा विषय काढला.

ती म्हणू लागली " मी भारताबद्दल खूप ऐकलेय. तिथली  संस्कृती  खूप सुंदर आहे. तिथले जेवण थोडे तिखट असते पण छान लागते. आणि तिथला निसर्ग तर खूपच मोहक. " तिची प्रशंसा ऐकून मला खूप बरे वाटले आपण भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटला. " मी तो मूवी पहिला मध्ये एकदा, काय बरे त्याचे नाव? …. हा , "स्लमडॉग मिलनेयर " खूप वाईट अवस्था आहे तिथे. किती गरीब आहे ना  भारत!! किती लोक अशी राहत असतील न तिथे!! " हे वाक्य ऐकल्यावर  मला खूप वाईट वाटले, खूप अशांती झाली मनाची . पण मी काही  शांत बसले नाही. लगेच तिला उत्तर दिले, " मला वाटते कि त्या मूवी मध्ये जे दाखवले आहे, तो आमच्या देशाचा खूपच छोटासा भाग आहे. तुम्ही एकदा आमच्या देशात या. तिथली संकृती, तिथली  प्राचीन काळची सुबत्ता तुम्हाला पाहायला मिलेल. आमचे देश तसे खूप श्रीमंत आहे. पारतंत्र्यात आमची सगळी संपत्ती लुटून नेण्यात आली. नाही तर  आज आम्ही आर्थिक रित्या जगातले सगळ्यात श्रीमंत देश असतो. ज्या भारतातली संपत्ती लुटून आज एक  देश इतके श्रीमंत झाले आहे, ते भारत किती श्रीमंत असेल हा विचार कोणी करत नाही. पण आता खूप प्रगती झाली आहे आमची. तुम्ही एकदा नक्की या भारतात. तुम्हाला खूप आवडेल. " असे म्हणून मी तिच्या प्रतिक्रियेची वाट पहिलि. माझ्या मनात देश प्रेमाच्या लाटा उसळ्या मारत होत्या.

तिला माझ्या मनातली घालमेल समजली होती. ती म्हणाली, " मी स्वतः एका गरीब देशातली आहे, युक्रेनची, मी समजू शकते कसे वाटते कुणी आपल्या देशाला गरीब म्हंटले की. सॉरी, जर मी तुम्हाला दुखावले असेल तर."  
" ओके . नो प्रोब्लेम, मला थोडे वाईट वाटले. पण ठीके. " असे म्हणत मी तो विषय संपवला. त्या वेळी मला त्या मूवी च्या डिरेक्टर चा, प्रोडूसर चा  खूप संताप आला होता. तो डिरेक्टर स्वतः  एक ब्रिटीश आहे.  त्या मुवीत दाखवायला  त्याला भारतातल्या कुठल्याच चांगल्या गोष्टी का मिळाल्या नाहीत. म्हणजे, त्या मुवीत  एक प्रकारे भारताची निंदाच  केली आहे असे म्हंटले तरी चालेल- असे विचार माझ्या मनात घोळत होते.  


परदेशात भारतीयांना नेहमी कमी दर्ज्याची वागणूक दिली जाते, ती याच्याच मुळे. भारत गरीब आहे, तिथे खूप गरिबी आहे. भारतीय म्हणजे घाण, अस्वछ, बेशिस्त असा गैरसमज बऱ्याच  फिरंग्यांना असतो. पण मनाला सारखे वाटते की त्यांनी  कितीही प्रगती केली तरी भारतीय माणसाच्या बुद्धिमत्तेची आणि माणुसकीची सर त्यांना कधीच येणार नाही.  कोणी आपल्या देशाला गरीब म्हणत असेल, आपल्या देशाबद्दल थट्टा, मस्करी करून काही वाईट बोलत असेल,  तर त्याची गोष्ट तुम्ही कबूल करू नका. आपल्या देशाचा मान राखा.!! जय हिंद !! 
!! जय महाराष्ट्र !!

No comments: