Thursday, November 14, 2013

चकली भाजणी सूप

चकली भाजणी सूप

दिवाळीनंतर चकली भाजणी  उरली तर काय?

त्याचे थालीपीठ होते. पण थालीपीठ सगळ्यांनाच नाही आवडत. तर एक नवीन मेनू आपण ट्राय करू शकतो.
चकली भाजणी सूप. अतिशय पोषक, आणि चविष्ट.  आपण यात आपल्या आवडीप्रमाणे कितीही भाज्या टाकू शकतो .



साहित्य

५-६  टेबलस्पून चकली भाजणी
१ चिरलेला कांदा
१/२ किसलेले किव्वा बारीक चिरलेले गाजर
१ टोमाटो बारीक चिरलेला
२ चमचे तेल
१-२ लसुन पाकळी बारीक चिरलेली
१/२- १ लिटर पाणी
मीठ चावी पुरता
हळद
कोथिम्बिर
१ मिरची

कृती

१. एका पातेल्यात पाणी आणि भाजणी एकत्र करावे. गाठी सोडवून घ्यावा
२. काढीत तेल गरम करावे आणि त्यात लसुन पाकळी, मिरची, कांदा परतून घ्यावा.
३. मग त्यातच टोमाटो, गाजर परतुन घ्यावे. हळद टाकावी.
४. भाज्या परतल्यावर त्यात  पाणी आणि भाजणी चे मिश्रण ओतावे. चावी पुरता मीठ टाकावे.
५. त्याला चांगली उकळी येऊ द्यावी. शिजू द्यावे.
६. सूप घट्ट होई पर्यंत उकळावे.
७. गरमागरम सूप बाउल मध्ये सर्वे करताना मस्त त्यावर कोथिम्बिर ने गार्निश करावे.


No comments: