Wednesday, May 6, 2015

झटपट सोयाबीन बिर्यानी
साहित्य

सोयाबीन चंक्स १/२ वाटी (२-४ तास  भिजवलेले)
बासमती तांदूळ (३ वाट्या)
कांदे २ नग (बारीक चिरलेले)\
टमाटे १ नग
वाटाणे १/२ वाटी
आले लसुन ठेचा- २-३ चमचे
हळद - १ चमचा
मीठ
तेल
पाणी


मसाला :

दालचिनी  १-२ काड्या
काळी मिरी - १ चमचा
तमालपत्र- १ नग
मोठी वेलची१-२
लवंग २-४
चक्रफुल- १-२
जावित्री १-२
लाल मिरच्या ३-४कृती

१. तांदूळ शिजवून त्याचा फडफडीत भात करावा.
२. एका भांड्यात ३-४ चमचे तेलात वरील मसाल्याची फोडणी करावी. त्यात कांदे लालसर परतून घ्यावे.
३. मग हळद व आले लसुन ठेचा टाकून थोडावेळ परतावे व मग  टमाटा, वाटाणे  व सोयाबीन चंक्स घालुन  शिजवून घ्यावे. त्या आधी सोयाबीन चंक्स चांगले पिळून त्यातील पाणी काढून टाकावे.
४. शिजल्यावर त्यावर भाताचा एक थर लावावा आणि पुन्हा झाकण ठेवून ५ मिनिट शिजू द्यावे.
५. दह्याबरोबर सर्व करावे.