१. जाते- जाते हे पीठ दळण्या साठी वापरले जाते. पूर्वी त्याचा वापर करताना नकळत स्त्रियांचा व्यायाम व्हायचा. त्यातून दळलेले पीठ हे अतिशय पौष्टिक आणि ताजे असते. आजही किती गावात शेतीसाठी किवा घरगुती कामांसाठी जाते वापरले जाते. पूर्वी स्त्रिया जाते वापरताना गाणी म्हणायच्या, ज्या मुळे असे शारीरक श्रम करताना त्यांना विरंगुळा मिळायचा. आज जात्याची जागा मोठ्या चक्क्यांनी आणि घरगुती चक्की ने घेतली आहे.
२. पाटा वरवंटा- चटणी, वाटण किव्वा पुरण वाटायला पाटा वरवंटा वापरला तर एक वेगळीच चव लागते, या . अत्यंत नैसर्गिक पद्धतीने वाटताना सुद्धा स्त्रियांचा व्यायाम होतो. आता याची जागा मिक्सरने घेतली आहे.
३. खल बत्ता - याला खल गोटा सुद्धा म्हणतात , हा मसाले वाटायला वापरला जातो. आज काल हा अनेक रुपात व आकारात मिळतो अगदी प्लास्टिक मध्ये सुद्धा.
४. व्हीळी- याने पूर्वी खाली बसल्या बसल्या स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांना खालीच बसून भाजी किव्वा अन्य कुठलाही पदार्थ चिरायला सोपे जायचे. तसेच नारळ खावायला सुद्धा व्हीळीच सोपी असते.
५. चूल - दगडाची, विटांची किव्वा शेणाची चूल अजूनही किती गावात वापरली जाते
No comments:
Post a Comment