Thursday, October 8, 2015

माईक्रोवेव खिचडी


साहित्य

२ वाटी तांदूळ
१ वाटी डाळ
१ गाजर चिरलेले
१ टोमाटो चिरलेला
१ सिमला मिरची चिरलेली
फोडणी साठी- तेल, मोहरी, कडी पत्ता, जिरे, हळद, लाल मिरची पुड, हिंग, धणे  जिरे पूड व मीठ चवीपुरता







कृती

१. माईक्रोवेव बाउल मध्ये १/२ चमचे तेल घेऊन, फोडणी चे सगळे समान त्यात निट मिक्स करून माईक्रोवेव मध्ये २-३ मीनिट ठेवावे. फोडणी चा सुगंध आणि मोहरी तडतडायला लागली कि बाहेर काढून घ्या.
२. मग ह्यात भाज्या टाकून निट मिक्स करून घेऊन  पुन्हा ४-५ मिनिट माईक्रोवेव करून घ्या.
३. आता ह्यात तांदूळ डाळ घालून चांगले मिक्स करून पाणी घालून पुन्हा १/२ तास माईक्रोवेव करून घ्या.
४. तयार खिचडी वर कोथिम्बिर टाकून सजवा. 

No comments: