आमचे कूलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा. थंडितल्या एका रविवारी मी सहकुटुंब कूलदैवतच्या दर्शनाला गेलो होतो. रविवार हा खंडोबाचा वार असल्यामुळे तिथे खुप गर्दी असणार हे आम्हाला ठाऊक होते, आणि म्हणून आम्ही सकाळी लवकर निघालो, त्यात जेजुरीचा गडही भराभर चढलो. पण वर चढल्यावर कळले की गर्दी काही कमी नव्हती. जेजुरीला व्हीआयपी पास पण मिळतो पण त्यात सुधा रांग, ही कल्पना मला आधीच होती, म्हणून मी माझ्या ओळखीच्या मित्राकडून ट्रस्टच्या एका मोठ्या पादविवाल्या माणसाचा मोबाइल नंबर मिळवला होता. आमचे चिरंजीव अगदी ६ महिन्यांचे असल्यामुळे ही सोय सुद्धा मी आधीच केली होती. बायकोला हे काही पटले नव्हते, कितीही उन असो किव्वा रांग असो, दर्शन रांगेत उभे राहूनच घ्यायचे, तेव्हाच आपल्याला खरे दर्शन केल्या सारखे वाटेल आणि देवाची कृपा होईल, असे तिचे म्हणणे होते. मी काही तिचे ऐकले नाही, त्या ट्रस्टच्या माणसाला फोन लावला, देवाच्या दर्शनाला शॉर्टकट मारायला मला जरा सुद्धा चुकल्यासारखे नव्हते वाटत. त्या माणसाशी बोलणे झल्यावर थोड्यावेळाने एक भट्जी देवळाच्या बाहेर आला. आम्ही व्हियायपीच्या रांगेत उभे होतो. त्याने माझे नाव घेतले आणि हाताने इशारा करत मला पुढे बोलावले. मी आणि माझ्या पाठी मागे बायको, बहीण तिचे यजमान आणि तिची मुले अशी लांब रांग लागली. आम्ही सगळे रांगेतल्या माणसांना बाजूला करत पुढे जाऊ लागलो, ते आमच्याकडे रागाने पाहु लागले. पण मी मोठ्या दिमाखात सगळे कुटूंब घेऊन पुढे सरकत राहिलो. रांगेतल्या २-३ बायका माझ्याबद्दल बोलत होत्या "कोण आहे हा नालायक माणूस? ... आपण इथे इतका वेळ उभे आहोत रांगेत. आणि हा सगळ्यानंना घेऊन घुसतोय मधे." माझी बायको, बहीण घाबरल्या होत्या. अत्यंत स्वार्थी आणि बेफिकीर होऊन आम्ही एकदाचे दर्शन घेऊन मोकळे झालो.
बहिणीला मुंबईला परतायचे होते लवकर म्हणून उतरायची पण घाई होती. खाली उतरताना एका तरुणाला माझा जोरात धक्का लागला आणि तो पडला. मी त्याला उठवायला मदत केली. शेवटी खाली उतरलो मग. बहीण आणि तिच्या घरचे मुंबई ला बस मधून रवाना झल्यावर मी आणि माझी बायको मुलाला घेऊन पुण्याच्या बसमधे चढलो. त्यात सुधा गर्दी होती. पण बायकोला लगेच जागा मिळाली मी मात्र उभाच होतो. टीसी जवळ येऊ लागला तसे मी ट्राउज़र च्या खिष्यात हात घातला, पाकीट काढायला. घाईघाईने पाकीट उघडले, पण पाकिटातले पैसे गायब होते. मला लगेच कळले की त्या मुलाने खूप हुशारीने माझ्या पाकिटातले सगळे पैसे मारले होते. पण नशिबाने माझ्या पाकिटटले एटीएम कार्ड त्याने नेले नाही. बायकोला तिकीट काढलायला सांगितले, पण तिच्याकडेही थोडेच पैसे होते. त्यातूनच आम्ही तिकिटे काढली. फक्त दहा बारा रुपये उरले होते तिच्याकडे. नवरा बरोबर आहे, मग चलती फिरती बॅंक आहे, मग कशाला हवी पर्स आणि पैसा, म्हणून मी काही तिला पैसे दिले नव्हते. माझा शहांपणा मला नडु लागला होता. तिला मे उभ्या उभ्या सगळी हकीगत सांगितली. ती लगेच मला टोमणा मारत म्हणाली " सांगितले होते, असे दर्शन नाही घ्यायचे, मिळाले ना फळ आता?" आता मला चुकल्यासारखे वाटू लागले होते.
बस मधून खाली उतरलो तेव्हा बायकोचा मूड काही चांगला नव्हता. जवळ एक एटीएम होते तिथे धाव घेतली आधी, तिथेही रांग. माझ्या पुढे ७ माणसे होती. हळू हळू रांग पुढे सरकली मझा नंबर आला तसा मी आत शिरायच्या आधीच एक माणूस पटकन आत मधे घुसला. कुठून आला होता काय माहिती, पण अचानक आला पाठीमगून. तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात गेलो होती. बायको हे सगळे नुसते पाहत होती. तिला पण आश्चर्य वाटले होते हे पाहून. थोड्या वेळाने तो माणूस पैसे काढून बाहेर आला आणि न बघताच पुढे चालू लागला. मी आपला ओरडत राहिलो " ओ काय हे? ही काय पद्धत आहे का? तुम्हाला काही शिस्त आहेत की नाही?" तो माणूस काही न बोलता खूप लांब निघून गेला होता आणि मी घसा फाडत उभा होतो. पाठीमागची माणसे पण काही तरी पुटपुटत त्या माणसाला रागाने पाहत होती. हे सगळे क्षणात झले होते, पण मी काही करू शकलो नाही. माझ्या बायकोचे म्हणणे आता मला पटले होते. खंडोबाने मला चांगलाच धडा शिकवला होता.
No comments:
Post a Comment