Monday, November 5, 2012

सासू सून आणि संसार !!!


आपले माहेरचे घर सोडून सून आपल्या घरात येऊन एका नवीन आयुष्याची सुरूवात करते. घरात प्रवेश करायच्या आधी तिला माहेरी खूप सल्ले दिले जातात. जसे की “सासुचे ऐईक!! सासुला मान दे!!” वगैरे वगैरे… लग्नाधीच तिला सासू या शब्दाची खूप भीती बसवली जाते. सुनेने सासू सासर्‍यांचा आई वडील म्हणून स्वीकार करावा अशी सगळ्यांची अपेक्ष्या असते आणि ते ती स्वच्छ मनाने करते. सासरी नवर्‍यानंतर तिचा सगळ्यात जास्त संपर्क हा सासूशी असतो. सुनेला जसे सगळे सोडून यावे लागते तसेच सासुला सुद्धा खूप मोठा मानसिक बदल सहन करावा लागतो. तिने आपल्या मुलाला लहानाचे मोठे केले असते. इतके वर्ष तो तिच्या मार्गदर्शनाखाली असतो. ती त्याच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची स्त्री असते. सून आल्यावर मुलाच्या आयुष्यातले आपले महत्व कमी तर होणार नाही अशी भीती तिला सतत वाटत राहते.
Image
सुनेने जर घरात स्वताहाला सामावून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले तर सासूने सुद्धा तिला त्यात साथ दिली पाहिजे. संसारात पदार्पण केल्यावर आपणही चुका केल्या असतील हे तिने विसरू नये. कुटुंबातील इतर सदस्यांसमोर सुनेला कमी लेखले, तिच्या चुका दाखवल्यां तर सुनेचा  आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि संसारात भांडी वाजण्यचि शक्यता वाढु शकते.
सुनेने सुद्धा सासुला आई समजून मोकळेपणाने तिचे मार्गदर्शन घ्यावे, पण सासूने याचा गैरफायदा घेऊ नये.
सुनेने सासूशी जवळीक साधताना तिला काय आवडते काय नाही हे विचारले तर तिला खूप बरे वाटेल. तसेच तिच्यामुळे  आपल्याला आज इतका छान नवरा मिळाला असे श्रेय तिला सुनेकडून मिळाले तर तिला आपले आयुष्य सार्थक झाले असे वाटेल. धून मधून सासूसठी काही तरी भेटवस्तू किव्वा तिला आवडेल अशी वस्तू द्यावी. तिला त्यात नावीन्य मिळेल.
सासूने सुद्धा, सुनेने आणलेल्या भेटवस्तूचे, तिला येण्यार्‍या कलाकौशल्यांचे कौतुक केले पाहिजे आणि तिला त्यात प्रोत्साहन दिले पाहिजे.
सुनेने आणि सासूने एकत्र राहण्यासाठी त्या दोघींनाही खूप तडजोड करावी लागते. पण घरात शांती, सुख आणि समृद्धी राखण्यामध्ये सासूचा खूप मोठा वाटा असतो, घरात आलेल्या सुनेला तिने परकेपणाने न वागावता “हे घर तुझेही आहे. तुला हवे तसे इथे राहा …” असे सांगितले तर सुनेला ते घर आपलेसे वाटेल. सुनेच्या सुखा-दुखात, संकटात तिच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहीले पाहिजे. जेवढे प्रेम आपण सुनेला देऊ तेवढेच किव्वा त्या पेक्षा जास्त ती आपल्याला उतारवयात परत देईल या अशेने तरी सासूने तिच्याशी जुळवून घ्यावे. जर काही बिणसलेच तर दोघींनी नीट विचार करून एकमेकांना समजूत घालावी. ह्यात वयाचे काही नसते, अंतर फक्त पिढीचे असते, स्वभावांच असते , विचारांचे असते हे दोघींनीही आपल्या मनाला पटवून दिले पाहिजे. दोघींनीही एकमेकींचा स्वाभिमान न दुखावता वागले पाहिजे.
शेवटी काय दोन माणसे कधीच सारखी नसु शकतात हे सुधा विसरून चालणार नाही. मग सासू सून पण माणसेच ना.
पण सासूने आणि सुनेने ठरवले तर त्या खेळीमेळिने राहू शकतात आणि संसार आनंदाचा करू शकतात.

No comments: