विनोद वं त्याची पत्नी लीना दोघे नुकतेच दुबईहून परतले होते, भारतात थोडा वेळ काढायला . एक दिवस ते सहजच ठरवल्याप्रमाणे नवीन घर शोधायला निघाले, खूप काही अनुभव आले, एखाद्या बिल्डींग चे मोक्क्याचे ठिकाण असे किव्वा एखादी बिल्डींग महालासारखी अलिशान, पण घराची किंमत खिश्याला नं परवडणारी, एखादी बिल्डींग अतिशय जुनी, एखाद्या सोसायटीत पाण्याची टंचाई, एखादी अगदीच अडचणीत बांधलेली, एखाद्या बिल्डींग मध्ये सगळ्या अमिनीटीज(सोयी) पण त्याचे ठिकाण रेलवे स्टेशन किव्वा बस स्थानका पासून अतिशय लांब. पण यातही त्यांना दोनदा गंमतशीर अनुभव आले, खास म्हणजे घर विक्री करायला उतावळे असलेल्या बिल्डरच्या सेल्स्मेन ची. आपण दुबईहून आलोय हि गोष्ट कुठल्याही सेल्समन पुढे उघडी नाही करायची असे विनोद वं लीना ने ठरवले होते.
एका ठिकाणी त्यांना दारातच सांगण्यात आले " आमच्याकडे फक्त एक करोडच्या वरच घरे आहेत." थोडक्यात एक करोड द्यायची ऐपत आणि तयारी असेल तरच पुढे या नाही तर तशीच परत कलटी मारा. एका ठिकाणी तर कहरच झाला, त्यांना सेल्समन ने एका वेगळ्या अंधारलेल्या खोलीत नेले वं एका मोठ्या LCD समोर बसवले वं त्यांना 3D गॉगल घालून बिल्डींग चे 3D चित्रीकरण दाखवण्यात आले, नंतर ते दृश्य पाहून झाल्यावर तो त्यांना चर्चा करायला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला, तेथे त्यांना चहा सामोसा सुद्धा खायला दिले वं तो म्हणू लागला "आमच्या बिल्डींग मध्ये खूप सोयी आहेत , २४ मजल्यांचे टॉवर आहे, २४ तास लिफ्ट साठी backup जनरेटर आहे, क्लब हाउस आहे, स्विमिंग पूल आहे, मुलांना खेळायला इटालियन स्टाईल गार्डन आहे, एन्ट्रन्स सुद्धा इटालियन स्टाईल आहे, इथून शाळा, कॉलेज, शॉपिंग मॉल जवळ आहे, इथे लोडिंग पण कमी आहे. " ते आपले ऐकत होते, "अहो!! एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ह्या बिल्डींगचा अर्कीटेक्ट कोण आहे माहिती आहे का तुम्हाला?", ते मान डोलवत नाही म्हणाले, त्यांना त्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टी जवळ जवळ मान्य होत्या आणि ते ऐकतच होते "अहो ज्या माणसाने दुबईला बुर्ज खलिफा डीसाइन केलाय नं, त्यानेच आमच्या बिल्डींग चे अर्कीटेक्चर केलेय. असे आर्किटेक्चर तुम्हाला कुठे शोधूनही मिळणार नाही. " हे ऐकल्यावर विनोद आणि लीना थक्क झाले होते ते एक मेकांकडे पाहून ओठ आवळून मान डोलवू लागले, पण तरीही त्याच्या हो ला हो करत त्यांनी ती चर्चा थांबवली वं नंतर पुन्हा येऊ असे आश्वासन देऊन तिथून निघाले. निघाल्यावर ते दोघेही पोट दुखेपर्यंत हसत होते.
No comments:
Post a Comment