Tuesday, February 25, 2014

सकाळ म्हणजे दिवसाची सुरुवात....

सकाळ म्हणजे दिवसाची सुरुवात, आणि सकाळ चांगली गेली की पूर्ण दिवस मग चांगलाच जाणार याची मला खात्री पटली आहे. सकाळ म्हणजे कशी स्वच्छ आणि सुंदर वाटते. सकाळी उगवणारा सुर्य आपल्या डोळ्यांवरची झापड तर काढतोच पण आपल्या किरणांमधून तो आपल्याला उर्जा देत असतो. ही उर्जा म्हणजेच positive energy, हल्ली मी  सूर्योदयाच्या आधी उठते. सूर्योदयाच्या आधीच माझी अंघोळही  आटपते,  आणि मगच चहाचा कप हातात घेते, चहाच्या कपातल्या वाफा जेव्हा चेहर्याला येउन लागतात तेव्हा अजूनच ताजे तवाने वाटू लागते. तेव्हा कळते कि खरच आपल्या संस्कृतीतले काही व्रत नियम खूप विचार करून बनवले आहेत. 

सकाळी खिडकीत बसून चहा पिताना मग हळू हळू बिल्डींगच्या मागून डोकावणाऱ्या सूर्याला पहायचे, असे वाटते की तो आपल्याला, "हाय, गुड मॉर्निंग!!!"  म्हणत म्हणत आकाशात प्रकाश पसरवत प्रवेश करतोय. 
सकाळी चालू होणारी रस्त्यावरची वर्दळ, गाड्यांचे आवाज, पाखरांचा किलबिलाट, माणसांची गर्दी …व्वा!!!!काय मस्त आहे हा वेळ. पूर्ण उर्जेने भरलेला. ह्या वेळेत पृथ्वीवरील सर्व जीवन्स्त्रुष्टीतील उर्जेचे प्रमाण  सर्वात जास्त असेल. ती उर्जा म्हणजे दिवसाची सुरुवात आणि मग दिवसभर आपल्याला तीच उर्जा कामास येते. तेवढ्यातच दारावर पडणाऱ्या पेपरचा आवाज येतो आणि मग ताज्या घडामोडी वाचायला आपण तयार असतो. 
No comments: