आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे तेव्हा आपण आजच्या दिवस अश्या महिलांना आठवूया ज्या खऱ्या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीने काम करून राबून आपल्या दैनंदिन घडामोडीत आपली मदत करीत असतात. या स्त्रियांना उच्च शिक्षण घ्यायची संधी मिळाली नसेल, त्यांना विकसित शहरातल्या स्त्रीयान्सारखे नीट- नेटके कपडे घालून, सौंदर्य प्रसाधने लाऊन वावरता येत नाही, परंतु तरीही त्या स्त्रियांचे आपल्या कामात नकळत होणारे योगदान उल्लेखनीय आहे.
१. शेतीत मजुरीचे काम करण्याऱ्या बायका, त्यांच्या अमाप कष्टाने त्या आपले घर चालावितातच पण आपल्याला अन्न पुरवितात.
२. मंडई मध्ये भाजी किव्वा मच्छी विकणाऱ्या बायका
३. बस आणि रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करून प्रवास्यांना सुखरूप त्यांच्या ठिकाणी पोचवणाऱ्या महिला चालक.
४. आपल्या घरात काम करणाऱ्या बायका, त्यांचा कामात हातभार असल्याशिवाय आपली रोजची धावपळ आटपणार नाही.
No comments:
Post a Comment