लिंग्विनी पास्ता
साहित्य :
७-८ बेबी टोमाटो
२ चमचे बोलोग्निस किव्वा टमाट्या चा सॉस
२ रंगीत सिमला मिरची
२ मोठे कांदे
१ लसुन
१ मोठे वांगे
१ झुकीनी किव्वा गिलके
१ पाकीट लिंग्विनी पास्ता
मीठ व मिरपूड चवीपुरता
ओलिव ओइल २-३ चमचे
१. ओवन १२० दशांश वर गरम करायला लावायचे.
२. सगळ्या भाज्या एक एक इंच लांब व रुंद कापाव्यात. बेबी टमाटे अक्खेच घ्यावे.
३. एका मोठ्या बेकिंग ट्रे मध्ये त्या पसरवून ठेवायच्या. त्यावर ओलिव ओइल, मीठ, मिरपूड टाकावे. ४. पास्ता शिजवून घ्यावा
५. एका भांड्यात थोडे तेल गरम करून त्यात बोलोग्निस टाकावे आणि ते चांगले गरम झाल्यावर त्यातच शिजलेला पास्ता टाकावा.
६. ओवन गरम झाले ट्रे मध्ये पसरलेल्या भाज्या त्यात १० मिनिटे बेक करून घ्याव्या.
७. प्लेट मध्ये तयार झालेल्या पास्ता वर या ट्रे मधल्या भाज्या पसरवून द्याव्या.
८. लीन्ग्विनी पास्ता तयार.