Saturday, August 23, 2014
मटर- पनीर पालक कचोरी
मटर- पनीर पालक कचोरी
साहित्य
सारण बनवण्यासाठी
१ वाटी पालक चिरलेला
१ वाटी मटार
१ सिमला मिरची चिरलेली
१ चमचा धने- जिरे पूड
काळी मिरी पूड चवीपुरता
मीठ चवीपुरता
हळद
तेल
कवर बनवण्यासाठी
थोडे घट्ट मळलेले गव्हाचे पीठ
कृती
१. कढईत २ चमचे तेल गरम करावे, त्यात मटार, पालक आणि पनीर आणि सिमला मिरची घालून ते मिक्स करून घ्यावे व शिजवावे.
२. मग त्यात काळी- मिरी पूड, हळद, धने जिरे पूड व मीठ घालून मिक्स करावे.
३. मग घट्ट कणकेच्या बारीक छोट्या पुर्या लाटून त्यात हे सारण भरून मोदक किव्वा कचोरी तयार कराव्या.
४. कढईत मंद आचेवर तळण्याकरिता तेल उकळवायला ठेवावे.
५. त्या तेलात ह्या कचोर्या सोडून त्या चांगल्या लाल होइस पर्यंत तळून घ्याव्यात.
६. तयार कचोऱ्या सॉस किव्वा केचप बरोबर खायला द्याव्या.
शाळेतल्या काही सुखद आठवणी
आता काही दिवसांनी शिक्षक दिन असतो तेव्हा वाटले आपल्या शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल काही लिहावे. शाळा पूर्ण होऊन बरेच वर्ष झाले तरी शाळेतल्या आठवणी अजूनही तरुण आहेत. काही सुखद आठवणी रोजच्या धकाधुकीच्या जीवनात कोरड्या पडलेल्या मनाला ओले करून जातात. शाळेतली शिस्त सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला त्या काळात प्रिय असतात. आपले आणि आपल्या वर्गमित्रांचे निरागस, निःस्वार्थ, चंचल आणि निरपेक्ष मन आता मोठे झाल्यावर खूप हवे हवेसे वाटते. जीवनात क्षणोक्षणी शिक्षकांनी आणि गुरुजनांनी आपल्याला दिलेले ज्ञानामृत आणि लावलेली शिस्त म्हणजे एक असे अमुल्य धन आहे जे घेऊनच आपण आजवर मोठे झालो आहोत.
मी मनातील अशीच एक सुखद आठवण इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
वर्गात चालू असणारा गोंधळ टीचर येताच क्षणात शांत व्हायचा. मित्र मैत्रिणींच्या गप्पा टप्पा अचानक बंद व्हायच्या. मग टीचर शिकवायला लागले की लक्ष्य द्यायचे आणि लक्ष्य लागत नसेल तर हळू आवाजात मैत्रिणींशी बोलत बोलत वेळ काढायचा. तरीही वेळ जात नसेल तर मग कागदावर किव्वा बेंचवर पेन ने एक्स-झिरो खेळायचे. मग टीचर ने जर नोट्स लिहून काढायला सांगितल्या तर वही उघडून ते म्हणतील ते लिहित जायचे. ते काय म्हणतायत ह्यात आमचे क्वचितच लक्ष्य असायचे. शिक्षक चालता चालता पुस्तक वाचत आपल्या जवळून जायचे तेव्हा मनात धडधडायला व्हायचे. शाळेतील शिक्षीकांबद्दल आम्हा मैत्रिणींना विशेष वाटणारी गोष्ट म्हणजे रोज त्यांच्या साड्या निरखून साड्यांचे कौतुक करावे त्या काळात शिक्षिका साड्याच नेसत असत, त्यामुळे त्या आपल्या आईसारख्याच वाटायच्या. नोट्स काढताना मन लिहण्यात गुंग असायचे आणि समजा शिक्षिका आपल्या बाजूने जाताना तिचा पदर आपल्या माथ्यावरून स्पर्श करून गेला तर मनाला खूप सुखद वाटायचे. कारण शिक्षिका म्हणजे आईची प्रतिमा, आणि तिचा पदर म्हणजे जसा आईच्याच मायेचाच पदर.

शाळेतील परीक्षेत, कला-क्रीडा महोत्सवात टीचरने दिलेले प्रोत्साहन आणि पाठींबा पुन्हा कधीही मिळत नाही. शालेय दिवस पुन्हा का नाही मिळत? शाळेतील मित्र मैत्रिणींसारखे सखे सोयरे पुन्हा कधी का मिळत नाही? अशी हूरहूर मनाला नेहमी लागत राहते आणि राहणार.
Subscribe to:
Posts (Atom)