Wednesday, January 22, 2014

एक नवीन wall पेंटिंग- लेडी इन ग्रीन सारी

एक नवीन wall  पेंटिंग-  लेडी इन ग्रीन सारी



Saturday, January 18, 2014

पेपर मेशे - पेपर चे उत्तम रिसायकल

पेपर मेशे - पेपर चे उत्तम रिसायकल

घरात पडलेल्या रद्दीचा,  म्हणजे, मासिक, बातमीपत्रांचे पेपर मेषे ने पुनर्वापर करता येतो.




      पेपर मेषे वास्कला सुंदर डीसाइन केल्यावर


साहित्य-

मैदा व पाणी समान प्रमाणात
पेपर किव्वा मासिक
साचा म्हणून प्लेट, बाउल, ग्लास, बाटली
अक्रिलिक कलर
oil कलर

कृती-

१. मासिक/ पेपरच्या बारीक स्ट्रिप्स फाडून घ्यायच्या.
२. मैदा आणि गरम पाण्याचा लगदा तयार करून घ्यायचा हाच आपला ग्लू असेल ज्याने पेपर एक मेकांना घट्ट चिटकून राहतील.
३. साचा साठी घेतलेल्या वस्तूला खाद्य तेलाने माखावे. एका पेपर वर हा साचा पालथा ठेऊन घ्यायचा.
४. एक एक स्ट्रीप घेऊन त्या ग्लु मध्ये बुडवून या साच्यावर ठेवत जायची.  असे अनेक थर  लावत जायचे.
५. हा मेषे ३-४ दिवस उन्हात वाळवत ठेवायचा. वाळल्यावर लाकडासारखा मजबूत होईल. तेलाचा थर असल्यामुळे तो साच्यापासून आपोआप  वेगळा होईल.
६. वाळलेल्या मेषे वर oil  colour  ने बेस कलर करून घ्यावा. मग त्यावर हवी  तशी अक्रिलिक कलर वापरून डीझाइन  करता येते.

चित्रांमध्ये काही नमुने दाखवले आहेत.



बाउल  चा साचा घेऊन तयार किला पेपर मेषे 



बाटली व प्लेट घेऊन तयार केलेले पेपर मेषे वास्क  आणि wall- पीस 






बाटली चा साचा घेऊन  तयार केलेला पेपर मेषे वास्क  सुकल्यावर असा दिसतो 


Sunday, January 12, 2014

कच्चे धागे


प्रतिक आज शाळेतून परत आला तेव्हा त्याचा चेहरा  खूप हिरमुसलेला होता. कोमल ने काही लक्ष्य दिले नाही.
आईला आपल्या मुलांचे वागणे, त्याचे कारण काय आहे हे ओळखायला काही वेळ लागत नाही. 

कोमलने त्याच्या समोर त्याच्या आवडीच्या नूडल्स भरलेला बाउल ठेवला. त्याचा चेहरा लगेच खुलला. 
मटा- मटा  खात त्याने तो बाउल कधी संपवला तिला कळले पण नाही. मग लगेचच तो बिल्डींग च्या बागेत खेळायला गेला. कोमल बरोबर तिची आई राहत होती. तिला आईचा खूप आधार वाटत असे. तिचे वडील लहानपीच हे जग सोडून गेले होते. 

कोमल ने त्याची स्कूल bag  उघडली. त्यात शाळेचे कॅलेंडर होते ते काढले. त्यावर प्रतीकचा फोटो पाहून तिला खूप बरे वाटले- आपला मुलगा शाळेच्या पहिल्या दिवशी किती रडला होता आता किती मोठा झाला. ८ वर्ष कुठे गेली कशी गेली, आठवले कि अंगावर काटा येतो- कोमल विचार करू लागली. मग तिने कॅलेंडर उघडले. त्यात एक सर्क्युलर लावले होते, स्कूल च्या एन्यूअल फंक्शन चे होते ते. आई वडिलांची सही मागितली होती. आई वडिलांना आमंत्रण दिले होते. कोमलने सही केली आणि कॅलेंडर पुन्हा आत ठेवले. 
४ वर्ष झाले तिचा प्रतीकच्या वडिलांशी म्हणजे कौस्तुभ शी घटस्पोट झाला होता. या चार वर्षात कौस्तुभ एकदा हि त्यांना पाहायला आला नाही. तिने स्वकर्तुत्वावर नोकरी करून प्रतिकला जपत जपत, त्याच्यावर प्रेमाचे पाणी शिंपून शिंपून त्याला मोठे केले होते. प्रतीकची वेळोवेळी होणारी  मनातली घालमेल, त्याची तळमळ तिला कळत होती पण ती काहीही करू शकत नव्हती, फक्त अश्रुचे घोट पिऊ शकत होती. कौस्तुभशी तिचा प्रेम-विवाह झाला होता. सासरच्यांनी तिला कधी आपले समजलेच नव्हते आणि घरातही तिला काही जागा दिली नव्हती. कौस्तुभ अत्यंत मोकळ्या मनाचा, मौज- प्रिय माणूस, हे ओळखायला तिने खूप उशीर केला. संसाराची गाडी हाकताना सविता  त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचा तोल  सरकला, इतका कि आपल्या मुलाला आणि पत्नी ला कायमचा सोडून जाण्याचा कठोर निर्णय तो घेऊ शकला. 
प्रतीकचे लहानपणीचे प्रश्न कोमलला नेहमी अडचणीत टाकायचे- पप्पा का नाही आले? पप्पा कुठे गेलेत? या वर्षी एन्युअल फंक्शनला ते येणार आहेत नं? मला मित्र विचारतात तुझे पप्पा कधीच का नाही दिसत?



प्रतिक खेळून परत आला, तेव्हा कोमल स्वयंपाकघरात काम करत होती, तिचा चेहरा पडलेला होता, मुलाच्या प्रश्नांना काय उत्तर देणार अशी चिंता तिला वाटत होती.  तोंड हात पाय धुवून तो हि तिथे आला आणि कोमलला घट्ट  मिठी मारून तिचा मुका घेऊन  म्हणाला, "मम्मी मी आता मोठा झालोय, मी आता तुला नाही विचारणार की, पप्पा का नाही येणार? मला कळते आता. ते आपल्याला भेटायला नाही येत नं  मग काय? आपण दोघे खूप मज्जा करूया. मला आजीने सगळे सांगितले समजावून. आई तू खूप छान आहेस."

कोमल मुसु मुसु रडू लागली, दुःखाने नाही तर आनंदाने, प्रतिक किती मोठा आणि समजूतदार झाला होता, हे तिला आज कळले. तिला खूप भरून आले होते. एका बाजूला कौस्तुभशी कधीही न जुळलेले कच्चे धागे तिला खुटत होते, आणि दुसऱ्या  बाजूला प्रतीकचे तिच्यावरचे वाढणारे प्रेम तिला सुखावत होते.