Wednesday, September 30, 2015

कीचन ट्रिक्स

१. भाजलेले शेंगदाणे सोलायला/ फोडायला  पाव- भाजी masher  ने मदत होईल 




२. बाटल्यांचे बर्ण्यांचे वं  टीन चे झाकण न फेकता पुन्हा वापरा. 





देवघरात दिव्या खाली ठेवायला




स्वयंपाक करताना तेलकट चमचा ठेवायला 


तेलाच्या बाटली खाली ठेवायला

Tuesday, September 22, 2015

घर बघतानाचे विनोदी अनुभव!!

विनोद वं त्याची  पत्नी लीना दोघे नुकतेच दुबईहून परतले होते,  भारतात थोडा वेळ काढायला . एक दिवस ते सहजच ठरवल्याप्रमाणे नवीन घर शोधायला निघाले, खूप काही अनुभव आले, एखाद्या बिल्डींग चे मोक्क्याचे ठिकाण असे किव्वा एखादी बिल्डींग  महालासारखी अलिशान, पण घराची किंमत खिश्याला नं परवडणारी, एखादी बिल्डींग अतिशय जुनी, एखाद्या सोसायटीत पाण्याची टंचाई,  एखादी अगदीच अडचणीत बांधलेली, एखाद्या बिल्डींग मध्ये सगळ्या अमिनीटीज(सोयी) पण त्याचे ठिकाण रेलवे  स्टेशन किव्वा बस स्थानका पासून अतिशय लांब. पण यातही  त्यांना दोनदा गंमतशीर अनुभव आले, खास म्हणजे घर विक्री करायला उतावळे असलेल्या बिल्डरच्या सेल्स्मेन ची. आपण दुबईहून  आलोय हि गोष्ट कुठल्याही सेल्समन पुढे उघडी नाही करायची असे विनोद वं लीना ने ठरवले होते.


एका ठिकाणी त्यांना दारातच सांगण्यात आले " आमच्याकडे फक्त एक करोडच्या वरच घरे आहेत." थोडक्यात एक करोड द्यायची ऐपत आणि तयारी असेल तरच पुढे या नाही तर तशीच परत कलटी  मारा. एका ठिकाणी तर कहरच झाला, त्यांना सेल्समन ने एका वेगळ्या अंधारलेल्या  खोलीत नेले वं एका मोठ्या LCD समोर बसवले वं  त्यांना 3D गॉगल घालून बिल्डींग चे 3D चित्रीकरण दाखवण्यात आले, नंतर ते दृश्य पाहून झाल्यावर तो त्यांना चर्चा करायला दुसऱ्या  खोलीत घेऊन गेला, तेथे त्यांना चहा सामोसा सुद्धा खायला दिले वं तो म्हणू लागला "आमच्या बिल्डींग मध्ये खूप सोयी आहेत , २४ मजल्यांचे टॉवर आहे, २४ तास लिफ्ट साठी backup जनरेटर आहे, क्लब हाउस आहे,  स्विमिंग पूल आहे, मुलांना खेळायला इटालियन स्टाईल गार्डन आहे, एन्ट्रन्स सुद्धा इटालियन स्टाईल आहे, इथून शाळा, कॉलेज, शॉपिंग मॉल जवळ आहे, इथे लोडिंग पण कमी आहे. " ते आपले ऐकत होते, "अहो!! एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ह्या बिल्डींगचा अर्कीटेक्ट कोण आहे माहिती आहे का तुम्हाला?", ते मान डोलवत नाही म्हणाले, त्यांना त्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टी जवळ जवळ मान्य होत्या आणि ते  ऐकतच होते "अहो ज्या माणसाने दुबईला बुर्ज खलिफा डीसाइन केलाय नं, त्यानेच आमच्या बिल्डींग चे अर्कीटेक्चर केलेय. असे आर्किटेक्चर तुम्हाला कुठे शोधूनही मिळणार नाही. " हे ऐकल्यावर विनोद आणि लीना थक्क झाले होते ते एक मेकांकडे पाहून ओठ आवळून मान डोलवू लागले, पण तरीही त्याच्या हो ला हो करत त्यांनी ती चर्चा थांबवली वं नंतर पुन्हा येऊ असे आश्वासन देऊन तिथून निघाले. निघाल्यावर ते दोघेही पोट दुखेपर्यंत हसत होते.  

Monday, June 29, 2015

पाण्याच्या किव्वा कोल्ड ड्रिंक च्या प्लास्टिक बॉटल चा असा पुनर वापर करून वेस्ट रिसायकल करा.



    बॉटल  अशी कापून घ्या

उरलेल्या भागाचा फनेल म्हणून वापर करा. 



काही पदार्थ पिशवीत असतात आणि त्यांना हवा लागून ते खराब होऊ शकतात, त्यांना  अश्या प्रकारे घट्ट बंद करा. 




किचन मध्ये मांडण्या किव्वा कपाटे अशी लावा

किचन मध्ये डबे, भांडी इत्यादी वस्तू अश्या पद्धतीने  लावल्या तर नीट- नेटकेपणा  तर दिसतो आणि स्वच्छता  ही राहते, तसेच किचन मध्ये काम करणे आपल्याला सोपे जाते.



















छोट्या बेडरूमचे कमीत कमी सामानात असे नियोजन करा









Sunday, June 28, 2015

वेस्ट रिसायकल- बॉक्स चे पेपर/ मासिक होल्डर

घरात एखाद्या विकत घेतलेल्या वस्तूचा एखादा चपटा बॉक्स  असेल तर तो फेकू नका, तुम्ही त्याचे सुंदर पेपर/ मासिक होल्डर  बनवु शकता  आणि घराची शोभा वाढवू शकता .






























साहित्य:

एक चपटा  बॉक्स

चार्ट  पेपर(कुठल्याही रंगाचा )
फेविकोल 
कातर 
न्यूसपेपर(कटिंग साठी )
सजावटीसाठी तुम्ही तुमच्या पसंतीचे समान वापरू शकता 

कृती:

१. बॉक्सला उभे ठेऊन वरचे झाकण कापून टाकावे वं  बाजूला ठेवावे. 


२. न्यूसपेपर घेऊन त्याला बॉक्स च्या मापाइतके वरून थोडेसे वळण देऊन कटिंग करून घ्यावे. मार्कर ने ह्या कटिंग प्रमाणे मार्क करून बॉक्स कट करून घ्यावा.  








३. बॉक्सच्या कापलेल्या झाक्णांना फेविकोल लाऊन ते बॉक्सच्या आत तळाला चिटकवून घ्यावे म्हणजे पेपर होल्डरला उभे राहायचे बळ  येईल. 

४. बॉक्स चार्ट पेपर वर ठेऊन पेन्सिलने मार्क करून घ्यावे वं त्याच्या वळणदार कडांना असे कट द्यावे. मग फेविकोल लाऊन चार्ट पेपर ला संपूर्ण बॉक्स वर चिटकवून घ्यावे. 





























५. तयार होल्डरला  हवे तसे सजवा. मी असे सजवले…