Wednesday, June 24, 2015

घरगुती जीरा आणि पालक खारी

साहित्य:
मैदा १ कप 
गव्हाचे पीठ १/२कप 
डालडा  किव्वा बटर १ कप 
पालक ची प्योरी(पालक उकळून  मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा) १/२ कप थंड केलेली 
सोडा २-३ चिमुट भर 
जिरे १/४ चमचा 
तीळ १/४ चमचा 
ओवा २ चिमुट भर 
मीठ 
बेकिंग ट्रे 
पाणी 




कृती :

१. एका भांड्यात गव्हाचे पीठ, मैदा आणि १/२ कप डालडा एकत्र करावे व पाणी सोडून वरिल सगळे समान टाकून पीठ घट्ट माळून घ्यावे. लागले तर पाणी टाकावे अजून. 
२. उरलेल्या डालडा मध्ये मैदा टाकून ते सारण फेटून एका भांड्यात वेगळे ठेवावे . 
३. तयार पिठाच्या तीन एकसारख्या लाट्या करून त्या जाड पराठ्यांसारख्या लाटून घ्याव्या. एक पोळी घेऊन त्यावर लाटण्याच्या टोकाने दाबून छोटे खड्डे करावे वं  मग डालडा आणि मैद्याचे सारण त्याच्यावर पसरवून घ्यावे, दुसरी पोळी पहिल्या पोळीवर ठेऊन पुन्हा वरील पद्धतीने सारण लाऊन घ्यावे, वं  मग तिसरी ठेऊन त्याला सुद्धा सारण माखून या तीन पोळ्यांचा रोल करून घ्यावा रोल लाटून पुन्हा सारण लाऊन रोल करावा, आणि असे पाच वेळा करून तो रोल फ्रीझर मध्ये बंद डब्यात १/२ तास ठेऊन द्यावा. 
४. ओवन २३० दशांश वर आधीच गरम करून घ्यावे. 
५. अर्ध्या तासाने ह्या रोल ला काढून त्याला लाटावे वं त्याचे खारी सारखे पिसेस करून ते अर्धा तास बेक करावेत. पालक ची खारी तयार 
६. साधी जीरा खरी बनवायला, वरील कृती  मध्ये पालक प्योरी न टाकता पाणी टाकून बनवावी. 



Saturday, June 20, 2015

तिची डिलिवरी झाली तेव्हा….

नुकतीच रमाची  डिलिवरी झाली होती, पहिल्यांदाच ती आई झाली होती. आईपणा म्हणजे काय हे तिला माहीतच नव्हते. या आधी असच काही, सून वं बायको पण तिच्या साठी नवीन होते.  पण प्रत्येक नवीन नातं शिकून, चुका करून ती सांभाळून घेत होती. महाराष्ट्रात पहिली डिलिवरी माहेरी असते, त्याप्रमाणे ती पण माहेरीच होती. हल्ली नॉर्मल डिलिवरी म्हणजे चमत्कार झालाय, पण तिच्याबापतीत तो घडला होता. मुल झाले तसे सगळे तिला भेटायला येत होते. त्यात अनेक अनुभवी बायका पण होत्या. आई झाल्यावर रात्र अपरात्र जागून बाळाची काळजी तर स्त्रीला घ्यावीच लागते, पण त्याहूनही जास्त तिला सासरच्यांचे वं  अनुभवी स्त्रियांचे अचानक अनपेक्षित असंख्य सल्ले आणि आपण आई म्हणून कसे चुकतोय याची जाणीव करून देणे, याला सामोरं जावे लागेल हे तिला नुकतेच कळले होते. नवरा आर्मीमध्ये वं बॉर्डर वर लांब असल्यामुळे, तिची विवंचना व आनंद ती केवळ तिच्या आईशीच बोलू शकत होती. 



रात्री तिची आई जेवणाचा डबा  घेऊन  इस्पितळात आली होती, तेव्हा ती आईला म्हणाली, " आई, मला निसर्गाने जन्मताच आई बनवले होते ना?" 
तिची आई हसत म्हणाली ," हो. लहानपणी तू तासंतास भातुकली खेळत बसायची, तेव्हा आपल्या बाहुलीची खूप काळजी घ्यायची. तिला खऱ्या बाळासारखी  जपायची." थोडा वेळ थांबत  ती म्हणाली, " पण तू असे का विचारतेस?"

आपल्या बाळाला जवळ घेत रमा म्हणाली, " दोन दिवस झाले मला इस्पितळात, माहेरचे नातेवाईक, माझ्या सासरचे नातेवाईक, अनेक स्त्रिया पाहायला  येउन गेल्या .पण  त्यांच्या कडून मला असे  सल्ले ऐकावे लागतील असे वाटले नव्हते, ' अगं  बाळाला नीट धर, त्याची मान सांभाळ' ,  ' बाळाला टोपी का नाही घातली?', 'गुटी द्यायला विसरू नको हा!!', 'बाळाची तब्येत मस्त झाली पाहिजे, चांगला खात जा', ' बाळाला मांडीत नको घेऊ हा जास्त.' , 'बाळाला जवळ घेऊन नको झोपू.' , वगैरे वगैरे. सासरचे हळूच म्हणतात ' आपल्या घरी कधी जायचं आपल्या बाळाला?' , आई हे मुल माझ्याच उदरी जन्माला आलय, तू पण म्हणतेस कि मी बाहुलीला जपायचे, मग या खऱ्या-खुऱ्या  बाळाला मी जपणार नाही असे का वाटते सगळ्यांना? अजून दोनच दिवस झालेत मला बाळ  होऊन, पण मी लगेच कशी एका अनुभवी आई सारखी वागू?  असे का वागतात सगळे? अनुभवातूनच माणूस शिकतो हे सगळ्या स्त्रियांना का कळत नाही." रमा आईकडे पाहत पुढे म्हणाली ," निसर्गानेच  स्त्रीला ही  शक्ती दिलीये आणि ती शक्ती वापरण्याची कलाही तिच्या अंगी उपजतच असते. जाऊदे तू हसत बघतेस, खरच आईला सुरुवातीपासूनच किती ऐकावे लागते हे आता कळतंय. बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असे नुसते म्हणतात, शारीरिक रित्या ती थकलेली असतेच, परंतु तिच्या  मनाचे काय?  आपण स्त्रिया अनुभवाने शहाण्या होतो, पण दुसऱ्याला शहाणपणा दाखवणं का सोडत नाही? जसे आपण अनुभवातून शिकतो तसेच नवजात आया, सुना, पत्नी, सुद्धा शिकणार हे लक्ष्यात ठेवावे." अचानक रमाचे बाळ रडू लागले, त्याने शी केली होती, ती साफ करायला त्या दोघी, आई आणि आजी कामाला जुंपल्या. 

पालक आणि चीज sandwich



सकाळचा नाश्ता चुकवला तर दिवसाची सुरुवत चांगली होत नाही. सकाळी फ्रीज मध्ये पालक पडला होता. पालक ची भाजी खाऊन कंटाळा आला होता, मग त्याचा वापर कसा करावा? जाम भूक लागली होती,  तेव्हा एक झटपट sandwich  करायची आईडिया आली, किचन मध्ये हे सगळे सामान शोधून काढले,






पालक बारीक चिरला
ब्राऊन ब्रेड,
चीज (किसलेले),
मीठ,
काळीमिरी पूड,
सिमला मिरची बारीक चीरलेली,
बटर.




मग,
१. ब्रेडचे दोन स्लाईस घेतले ,त्यांना बटर लावले.
२. त्यावर एक थर चीजचा लावला, वं  त्यावर पालक व सिमला मिरची टाकून, काळी मिरी पूड आणि मीठ शिंपडले, मग ते sandwich  ग्रील करून घेतले. ग्रील नसेल तर झाकण ठेऊन तव्या वर सुद्धा बटर मध्ये भाजून घेतले तर हरकत नाही



Thursday, June 18, 2015

अशोका हलवा

आपल्या दक्षिण प्रांतात अतिशय नावाजलेला, अत्यंत पौष्टिक असा अशोक हलवा, आज करून पहिला. तयार व्हायला थोडा वेळ लागतो, पण चवीला तितकाच  उत्तम लागतो.


साहित्य

१/२ कप मुंग डाळ
१/२ कप गव्हाचे पीठ
१ कप साखर
१/२ कप तूप
१ चमचा वेलची पूड
१०-१२ काजू


कृती

१. एका भांड्यात मुग डाळ  लालसर होईपर्यंत भाजून घ्यावी, ती बाजूला काढून त्यात खूप कमी गरजेपुरताच पाणी घालून कुकरमध्ये लाऊन शिजवून घ्यावी. शिजवलेली मुग डाळ  एकरूप फेटून घ्यावी.
२. एका कढइ मध्ये तूप घालून त्यात गव्हाचे पीठ वं काजू भाजून घ्यावे. त्यात मुग, साखर घालून फेटत राहावे. मग त्यात वेलची पूड घालून फेटत राहावे.
३. तूप बाजूनी सुटू लागले कि समजावे हलवा तयार झालाय.





बीटरूट आणि दह्याचे रायते


प्रिय मित्रांनो, बीटरूट हे जीवनसत्व  सी आणि लोह, अश्या पोषक पदार्थांचा साठा आहे, वजन कमी करण्यासाठी वं सुंदर आरोग्यासाठी हे चविष्ट रायते नक्की करून पाहा.

साहित्य

१ बीटरूट
१ कप दही
मीठ
फोडणीसाठी- मोहरी, जिरे, कडीपत्ता, तेल, मिरची

कृती

१. बीटरूट उकडून, सोलून, त्याला  १.सेमी चौकोनी चिरावे.
२. एका भांड्यात, दही मस्त एकरूप होइपर्यंत फेटून घ्यावे, मग त्यात बीटरूट टाकावे.
३. फोडणी करावी आणि यावर टाकावी, मीठ घालावे , तयार रायत्यावर कोथिम्बिर घालून सर्व करावे. 

Monday, June 15, 2015

मिसळ पाव

नुकताच "वल्ड्स  टेस्टीअस्ट  फूड(जगातील सर्वात रुचकर पदार्थ ) ",ठरलेला पदार्थ  मिसळ पाव 

Tuesday, June 9, 2015

मिंट लस्सी

साहित्य :

पुदिन्याची १०-१२ पाने
३ चमचे साखर
१/२ चमचा चाट मसाला
१/२ चमचा मीठ
३ कप घट्ट टाक




























कृती
१. ताक, साखर आणि पुदिना ब्लेंडरने एकत्र करून घ्यावे.
२. त्यात मीठ आणि चाट मसाला टाकून सर्व करावे.