Monday, June 15, 2015

मिसळ पाव

नुकताच "वल्ड्स  टेस्टीअस्ट  फूड(जगातील सर्वात रुचकर पदार्थ ) ",ठरलेला पदार्थ  मिसळ पाव 

Tuesday, June 9, 2015

मिंट लस्सी

साहित्य :

पुदिन्याची १०-१२ पाने
३ चमचे साखर
१/२ चमचा चाट मसाला
१/२ चमचा मीठ
३ कप घट्ट टाक




























कृती
१. ताक, साखर आणि पुदिना ब्लेंडरने एकत्र करून घ्यावे.
२. त्यात मीठ आणि चाट मसाला टाकून सर्व करावे.

Wednesday, May 6, 2015

झटपट सोयाबीन बिर्यानी




साहित्य

सोयाबीन चंक्स १/२ वाटी (२-४ तास  भिजवलेले)
बासमती तांदूळ (३ वाट्या)
कांदे २ नग (बारीक चिरलेले)\
टमाटे १ नग
वाटाणे १/२ वाटी
आले लसुन ठेचा- २-३ चमचे
हळद - १ चमचा
मीठ
तेल
पाणी


मसाला :

दालचिनी  १-२ काड्या
काळी मिरी - १ चमचा
तमालपत्र- १ नग
मोठी वेलची१-२
लवंग २-४
चक्रफुल- १-२
जावित्री १-२
लाल मिरच्या ३-४



कृती

१. तांदूळ शिजवून त्याचा फडफडीत भात करावा.
२. एका भांड्यात ३-४ चमचे तेलात वरील मसाल्याची फोडणी करावी. त्यात कांदे लालसर परतून घ्यावे.
३. मग हळद व आले लसुन ठेचा टाकून थोडावेळ परतावे व मग  टमाटा, वाटाणे  व सोयाबीन चंक्स घालुन  शिजवून घ्यावे. त्या आधी सोयाबीन चंक्स चांगले पिळून त्यातील पाणी काढून टाकावे.
४. शिजल्यावर त्यावर भाताचा एक थर लावावा आणि पुन्हा झाकण ठेवून ५ मिनिट शिजू द्यावे.
५. दह्याबरोबर सर्व करावे.



Sunday, March 8, 2015

"स्त्री- पुरुष समानता" - सिद्ध करणाऱ्या काही बायकांना सलाम

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे तेव्हा आपण आजच्या दिवस अश्या महिलांना आठवूया ज्या खऱ्या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीने काम करून राबून आपल्या दैनंदिन घडामोडीत आपली मदत करीत असतात. या स्त्रियांना उच्च शिक्षण घ्यायची संधी मिळाली नसेल, त्यांना विकसित शहरातल्या स्त्रीयान्सारखे नीट- नेटके कपडे घालून, सौंदर्य प्रसाधने लाऊन वावरता येत नाही, परंतु तरीही त्या स्त्रियांचे आपल्या कामात नकळत होणारे योगदान उल्लेखनीय आहे. 

१. शेतीत मजुरीचे काम करण्याऱ्या बायका,  त्यांच्या अमाप कष्टाने त्या आपले घर चालावितातच पण आपल्याला अन्न पुरवितात.

२. मंडई मध्ये भाजी किव्वा मच्छी  विकणाऱ्या बायका



३. बस आणि रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करून प्रवास्यांना सुखरूप त्यांच्या ठिकाणी पोचवणाऱ्या  महिला चालक. 


४. आपल्या घरात काम करणाऱ्या बायका, त्यांचा कामात हातभार असल्याशिवाय आपली रोजची धावपळ आटपणार नाही. 





Wednesday, March 4, 2015

भुताची गोष्ट


एका खेड्यात नुकतेच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले होते, रस्त्याच्या  बाजूला
लागून एक खूप वृद्ध वडाचं  झाड होतं, त्याच्या फांद्या, पारंब्या इतक्या मोठ्या होत्या कि वाटेत पडद्या सारख्या लोंबकळू लागल्या होत्या.  रात्री तर त्या वाटेवर गाडी घेऊन लोक जात नसत कारण गाडी चालवणाऱ्या माणसांचे अपघात वाढू लागले होते.  मागच्या महिन्यापासूनगावात त्या वडाच्या झाडाबद्दल गावात खूप चर्चा होती. लोकांचे म्हणणे होते की, ह्या वडाच्या झाडावर एक खूप वाईट भूत राहते, ते खूप विचित्र दिसते, रंगाने काळे-कुट्ट, केसांच्या जटा मोठाल्या, संपूर्ण चेहऱ्यावर पसरलेल्या, रात्री बारा नंतर दोन-चाकी गाडीवर जाणाऱ्या माणसांना अचानक ते भूत दिसायचे आणि ते पडून जखमी व्हायचे. पण भुताने आज पर्यंत कोणाला इज केली नव्हती. लोक घाबरून गेले होते, त्या वडाच्या झाडाजवळ सुद्धा जायला तयार नव्हते. गावाच्या सरपंचाने खूप उपाय केले, आधी पारंब्या कापल्या पण तरी अपघात काही कमी होईना, मग झाडाची फकीर, बाबा बोलावून पूजा, शांती वगैरे करून घेतली तरी काही फरक पडला नाही. लोकांना त्या भूताचे दर्शन व्हायचेच. लोकांनी त्या झाडाजवळ जायचे बंद केले, पारंब्या कापायला सुद्धा माणसं  मिळत नव्हती, इतके ते झाड प्रसिद्ध झाले होते. 

एका रात्री त्या गावच्या सरपंचाने आणि लोकांनी ठरवले आज या गोष्टीचा उलगडा करायचाच. जाळी, हत्यारे घेऊन एकदम जय्यत तयारी करून, काही लोकं  बाराला त्या झाडाच्या आजू बाजूला लपून उभी राहिली. थोड्या वेळाने एक माणूस ठरवल्याप्रमाणे दोनचाकी  गाडी घेऊन आला. ते भूत झपाट्याने खाली उतरले, आणि गाडी समोर जाऊ लागले, लोकांनी लगेच जाळी टाकून त्याला पकडले, आणि तिथेच बांधून ठेवले. सगळी माणसं त्याच्या भवती गोळा झाली आणि त्या भुताला जवळून पाहू लागली, तो खंडू नावाचा गावातलाच शाळकरी तरुण मुलगा निघाला, सगळे खूप रागावले होते त्याला पाहून त्याला मारू लागले. सरपंचाने सगळ्यांना शांत व्हायला सांगितले आणि त्याला विचारले, " काय  रं पोरा, यो कशापाई केलं?आरं, तुझ्या बापाचाच मळा यो, यो झाड, तुझ्या बाबाने(आजोबाने) लाविलं  व्हतं , कशा पाई सांग?" 

खंडू रडतच सांगू लागला, " मला माफ करा!! मी चुकलो!!…. माया बाबानं (आजोबाने) यो वडाचं झाड लाविलं  व्हतं, तो म्हातारा म्येला पन ह्यो झाड तो आपल्याला देऊन ग्येला, मागल्या महिन्यात एका सरकारी माणसाने बापाला पैसा चारला, त्याला ह्यो झाड कापायची परवानगी  पायजे व्हति. यो झाड पुढल्या महिन्यात तोडायला हवं , इथं  रस्ता रूंद करायचं सांगत व्हता  माया बापाला, बापानी दम दिला व्हता कुनाला सांगितला तर मला आनि आईशीला मारून टाकेल, मला लाई ब्येकर वाटलं, मी ठरवलं  झाडाच्या आस पास पन कुनाला वावरू द्येनार न्हाय. म्हनून मी यो असा वागलो, काळे कपडे आणि खोटे क्येस लावून लोकांना भीती घालाया लागलो,  मला माफ करा!"  



Thursday, January 15, 2015

Shame on our Media & Censor Board

Whenever I put on television I am worried about my kid if he will see, what he should not, at this age, 4. I feel shameful about the increased vulgarity in media specifically in ads and movie songs.


If we observe the content that is shown on National TV channels, we can see that  Deodorant Sprays and many other hygiene products are actually used to maintain personal hygiene, but in our country they are solely used to attract women and men, as it is shown in commercials. Many of the Bollywood songs are full of scenes that show men and women getting intimate,  Bollywod actresses are considered sex-symbols, only for their glamour not for their acting skills. Contraceptive commercials are aired at any time that too with vulgar scenes and one of it has an american ex-pornstar inviting men. Bollywood is really short of actresses!! On one side we are worried about the security of women in India, but a woman(ex-pornstar) shown inviting men, is not considered a rapist, but a star. Rape is a crime, Rapists are criminals and should be severely and immediately punished, but what about these cheap tactics that the media is using to flourish and at the same time provoking our youngsters to act accordingly? Is Our Censor Board sleeping? I would also like to add that many of us are highly influenced by western thoughts and culture, but if it is about security of women, India is much safer than some western countries. Pls refer rape rate graph. 

Tuesday, October 7, 2014

Please Stop!!! - Kashta Saree and Maid Service wrongly linked.


I don't understand why there is a confusion in some non- maharashtrians that a maid is supposed to wear only  kashta saree. Does it mean that women who are serving as maids are always Maharashtrians? Recently I came across a post on Facebook and Whatsapp showing a maid dressed in a kashta saree. The picture was actually showing indignity towards the kashta saree and service of a maid, and a person working as a maid has no Self-esteem. Madhuri Dxit was portrayed as a maid in one commercial wearing kashta saree too. Why? I have come across two to three incidents in Mumbai where Maharashtrian women wearing Kashta saree were misinterpreted as maids and asked without complete knowledge about them, "Ghar kaam ke liye chahiye? mahine ka kitna lengi?" and similar questions. 






I think people who have such misunderstanding about kashta saree should note that Kashta  Saree is a nine yarded saree and a  typical maharashtrian dress that is worn by many women in rural maharashtrian areas and some old women in urban areas even today, depicting the Maharashtrian culture. In fact, Rani Lakshmi Bai of Jhansi, Rajmata Ahilyabai Holkar of Indore and Veermata Jijabai of Maharashtra were the great women rulers belonging to Maratha Warriors, draped in a nine yarded  Kashta saree. Savitribai Phule, an Indian social reformer also used to wear a kashta saree.  My Grandmother, Mother in law too wear a Kashta saree. A kashta saree is also worn by some young maharashtrian women on auspicous occasions like Marriage Ceremony, Festivals, Poojas, Hom Havan Etc. Kashta sarees are available in various materials today, Silk namely - Paithani and Narayan Peth, Cotton, Polyster, Terryline. Paithani and Narayan peth are the most expensive varieties in Kashta saree.  So before posting such pictures or ads it is Important to note that a maid, or housemaid or maidservant, is a person employed in domestic service, but  no less than a person earning for his/ her own livelihood and a female maid can be seen in many other outfits too, she can wear a punjabi suit, a chaniya choli, a six yarded saree, western outfit etc.